रुई नालकोल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न.
रुई नालकोल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन 40 महिलांना सन्मानित करण्यात आले
बीड जिल्ह्य ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील रुई नालकोल ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अंगणवाडी सेविका जाधव कौशल्या सुदाम ,आशा सेविका दलतोड माधुरी पोपट यांचा सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला यावेळी इतर सामाजिक क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या महिला बचत गट, शिक्षिका, आरोग्य सेविका यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती नामदेव धोंडे, सरपंच संजय काका नालकोल, उपसरपंच अनिल गजघाट, पांडुरंग धोंडे, चेअरमन शरद नालकोल,ग्रामसेवक शिवाजी पांडुळे ,शरद नानाभाऊ पवार, परसराम धोंडे, आजिनाथ कन्हेरकर ,आजिनाथ नालकोल,शाळेचे मुख्याध्यापक देविदास गांजुरे , सुरेश गांजुरे, गणेश कापसे,बापु हिंगणे, युवराज हिंगणे,आबा नालकोल, हनुमंत आडकर तसेच गावातील महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना बनसोडे तर आभार मिनाज शेख यांनी मानले.
Comments
Post a Comment