अमरसिंह पंडित यांनी मुस्लिम समाजाचा सन्मान केला सहाल चाऊस
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे
मुस्लिम समाजातील एक साधा व सच्चा कार्यकर्ता मुजिब पठाण यांची बाजारसमितीच्या सभापती पदी निवड करुन अमरसिंह पंडित यांनी समानतेची परंपरा पुढे ठेऊन तमाम मुस्लिम समाजाचा सन्मान केला अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सहाल भैय्या चाऊस यांनी दिली. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराई बाजार समितीचे नवनियुक्त सभापती मुजिब पठाण यांचा सत्कार करताना ते बोलत होते.
गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुजिब पठाण यांची तर उपसभापती पदी विकास सानप यांची नियुक्ती करण्यात आली. अमरसिंह पंडित यांनी या निवडीत सोशल इंजिनिअरिंग साधले असून त्या पार्श्वभूमीवर माजलगावे माजी नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड येथे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि संभापती मुजिब पठाण यांचा सत्कार केला.
या वेळी सहाल चाऊस यांच्यासह, रशीद भाई, सलीम खान, नगरसेवक तालेब भाई मुजमल पटेल, अंगा खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment