भव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर गरजु रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा - रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे



बीड प्रतिनिधी : रुग्ण मित्र फाउंडेशन महाराष्ट्र, व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, तथा डॉ, श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच सिद्धिविनायक नेत्रालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये भव्य दिव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख श्री. मंगेशजी चिवटे साहेब व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. राम राऊत साहेब यांच्या प्रयत्नाने व आशिर्वादाने शिबीराचे आयोजन केले आहे. नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णांची शासकीय व खाजगी दवाखान्यातील होणारी हेडसांड पाहता रुग्ण मित्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी वेळोवेळी बीड मधील ग्रामीण व शहरी भागातील गरीब व गरजू रुग्णांकरीता सर्वरोग मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आले आहेत. मात्र यावेळी बीड जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील डोळ्यांच्या आजारांचे वाढते रुग्णांचे प्रमाण आढळून आल्याने याच समस्याला पाहता बीडमध्ये भव्य दिव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत माफक व शासकीय योजने नुसार आपल्या आजारांवरती उपचार व्हावा हाच ध्यास हाती घेऊन या मोफत नेत्र शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (बीड शहर कक्ष प्रमुख) रुग्ण मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी केले आहे.

 या मोफत महाआरोग्य शिबीरातील तज्ज्ञ डॉक्टर, डॉ, एकनाथ पवार (नेत्र शल्य चिकित्सक) M.B.B.S., D.N.B., F.V.R.S. (Shri Shankaradeva Netralaya, Guwahati) F.I.C.O. (U.K.) Phaco & Vitreo-Retinal Surgeon नेत्ररोग तज्ञ हे आहेत. हे हाॅस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधान मंत्री आयुष्यमान भारत योजना अंगीकुत हाॅस्पिटल, PM-JAY आहे. या शिबिरामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी, महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत (डोळ्यांची तपासणी, व मोफत शस्त्रक्रिया तसेच मोतीबींदु शस्त्रक्रिया (अल्पदरात) होणार आहे.
"शिबीरात तपासणी व उपचार", मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचा कर्करोग, लहान मुलांचा मोतीबिंदू, लहान मुलांचा तिराळेपणा, लासुर, रेटीना शस्त्रक्रिया व इंजेक्शन, मागील पडदा सटकणे, काचोळा, काचबिंदू, अपघाती मार लागणे. हाडांचे आजार, सर्जन जनरल फिजिशियन, इत्यादी राहिल.
टिप : वरील आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया माहात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत होतील.
सर्व रुग्णांनी येताना आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणावे. शिबीराचे ठिकाण, सिद्धिविनायक नेत्रालय व रुग्णालय, शासकीय विश्रामगृह शेजारी, जोशी गार्डन जवळ, नगर रोड बीड, शिबीर दिनांक ११/०६/२०२३ वार - रवीवार वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०६ पर्यंत राहिलं. टिप - रुग्णांनी सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत आणावे, नाव नोंदणी करता खालील नंबरवर ती संपर्क करा, धुरंधरे - 9172439307, विरेंद्र डुलगज - 8830210409 आर, जी,माने - 9604773773 संध्या भोसले 7498445933, देवा कुलकर्णी - 9881451734 किशोर सोनवणे - 9922184868 मोबीन सय्यद - तरी या मोफत व माफक नेत्र शस्त्रक्रिया शिबिर व सर्वरोग महाआरोग्य शिबिराचा लाभ बीड जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी आवश्यक घ्यावा असे आवाहन रुग्ण मित्र फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे. आयोजक - रोहित ऊर्फ (बाळासाहेब) धुरंधरे
(बीड शहर कक्ष प्रमुख) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड, तथा संस्थापक अध्यक्ष रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र.
संपर्क - ९१७२४३९३०७

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी