आमदार मा. रोहितदादा पवार यांची जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट
...
प़तीनिधी --गोरख मोरे
अहमदनगर :- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघांचे आमदार मा. रोहितदादा पवार यांनी जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.
त्यावेळी धनवे यांनी कार्यालयीन कामकाजाची व विविध योजनांची माहिती दिली मा. रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यात चांगले शैक्षणिक कामकाज चालले असून त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच त्यांनी शुभेच्छा ही दिल्या. तालुक्यातील शिक्षक केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
त्यावेळी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर राळेभात, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेलेकर, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विकास मंडळाचे संचालक मुकुंद सातपुते, सुरेश कुंभार , राजेंद्र त्रिंबके, राम निकम, किसन वराट, सुनील महारुद्र, मल्हारी पारखे, संजय घोडके, संजय वांढरे, बाबासाहेब कुमटकर, प्रताप गांगर्डे सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment