शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट , नागरीकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी "मोफत बाटलीबंद पाणी वाटप आंदोलन

शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट , नागरीकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी "मोफत बाटलीबंद पाणी वाटप आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
 बीड शहरातील शासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी, तहसिल, सामाजिक न्याय भवन, बसस्थानक आदि कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक व्यवस्था अपेक्षित असताना व त्यासाठी फिल्टर व इतर उपकरणांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आलेला असताना सुद्धा बारामाही लोकांना तहान भागवण्यासाठी विकतचे बाटलीतील पाणी घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन बीड शहरातील नागरिकांना १५-१७ दिवस पाणी पुरवठा न झाल्याने नागरीकांचे हाल होत असुन ऊन्हाळा कडक असुन तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला असताना जिल्हा व नगरपरीषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभार व ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ व तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "मोफत बाटलीबंद पाणी वाटप"आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे,शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामनाथ खोड आदि सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन 
‌ देण्यात आले.

सविस्तर माहितीस्तव
---
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभाग असुन या ठिकाणी रोज हजारो सामान्यांची आवक जावक असते मात्र या ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.विविध महसूल विभाग आणि तहसिल कार्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत देखील हीच अवस्था आहे.ईमारतीच्या पाठीमागील हौद अनेक वर्षांपासून कोरडाठाक असुन याठिकाणी बसविण्यात आलेले फिल्टर भंगार झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या ईमारतीत देखील पाण्याचा ठणठणाट आहे.

बसस्थानकात प्रवाशांना बाटलीतील विकतचे पाणी
---
उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात वाढ होत असतानाच बसस्थानकात ये -जा करणा-या हजारो प्रवाशांना विकतचे बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागते.सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

फिल्टर आदि. उपकरणांसाठीचा लाखोंचा खर्च
---
शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय व फिल्टर आदि उपकरणांसाठी लाखोंचा खर्च करण्यात येतो मात्र ही उपकरणे धुळखात वर्षोनुवर्षे पडुन आहेत.मुळात पाण्याची सोय नसल्यामुळे या उपकरणांचा काहीच उपयोग नाही त्यामुळे कंत्राटदार पोसण्यासाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे का?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

बीड नगरपरीषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे बीडकर तहानलेले , सुरळीत पाणीपुरवठा करावा.
----
बीड नगरपरीषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे बीड शहरातील नागरिकांना १५-१७ दिवस पाणी पुरवठा होत नसुन विद्युत पुरवठा व मुख्य पाईप लाईनला जागोजागी लिकेज यामुळे पाणी असुनही कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन तातडीने उपाययोजना करण्यात येऊन सुरळीत पाणीपुरवठा करावा.अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी