महाराष्ट्रातील सर्वात तरुण ग्रा.पं.सदस्य संतोष भैय्या खंदारे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य मोफत आरोग्य व शस्रक्रिया शिबिर संपन्न

बीड प्रतिनिधि,

  महाराष्ट्रातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य तथा स्वाभिमानी संघर्ष सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.संतोष भैय्या खंदारे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक रुग्णालय बीड , साई स्किन हॉस्पीटल बीड यांच्या संयुक्त विद्यमान्य व संतोष भैय्या खंदारे मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य व शस्रक्रिया शिबीराचे आयोजन कारेगव्हाण ता.जि.बीड येथे करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जय भगवान महासंघाचे अध्यक्ष तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते मा.बाळासाहेबजी सानप साहेब व बीड जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष मा.तानाजी आबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या शिबिरास परीसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात 300 ते 350 रुग्णांची तपासणी करण्यात आली गरजु रुग्णांना मेडिसीन वाटप करण्यात आली या शिबिरात प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ.एकनाथ पवार सर , जनरल सर्जन डॅा.अभिजीत येवले सर,प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.जिवण चव्हाण सर, प्रसिद्घ त्वचारोग,केस विकार व लेझर तज्ञ डॉ.सुषमा खोसे(देवगुडे), डॉ.सुप्रिया राठोड इत्यादी तज्ञ डॉक्टर रुग्ण तपासणीसाठी उपस्थित होते व या शिबिरात आवश्यक्ता असलेल्या रुग्णांची डोळे, मणका,कान,नाक,घसा,सांधे, व विविध आजारांवर शस्रक्रिया महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सिद्धिविनायक रुग्णालय बीड येथे मोफत करण्यात येणार आहेत शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी मा.बाळासाहेब सानप साहेब व तानाजी आबा कदम यांनी संतोष भैय्या खंदारे यांच्या कर्याचे कौतुक केले व असेच समाज उपयोगी कार्य करत रहा व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्या दिल्या व शेख मकसुद साहेबांनी संतोष भैय्यांच्या वाढदिवसानिमित्त 100 झाडे लावण्यासाठी दिले या शिबिरासाठी शेख मकसुद सर, नितिनजी ढाणे, जय महासंघाचे प्रसिद्धि प्रमुख संतोषजी बडे, आ.संदिप भैय्या क्षिरसागरांचे विश्वासु युवा नेते किरण केकाण, सरपंच सदाशिव खंदारे, माजी सरपंच शिवाजी खंदारे,गिन्यानदेव खंदारे, युवा व्याख्याते अनिल खेडकर चंद्रभान खंदारे,अर्जुन खंदारे, निलेश खंदारे, बळीराम खंदारे महादेव जाधव, अंगद राख,अक्षय डोईफोडे, प्रशांत बडे यांची उपस्थीत होती...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी