बोगस जप्तीचे टेंडर काढून 100 विनानंबर हायवा चालू करणाऱ्या तहसीलदार खाडे व आर टी ओ यांना सह आरोपी करा - राजेंद्र मोटे



गेवराई (प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांच्या अंगावर जप्तीचे टेंडर या गोंडस नावाखाली अवैध वाळू वाहतूक करणारा विनानंबर हायवा जाता जाता राहिला तसेच अंगरक्षक गाडी वरून झाडात धडकवण्याचा प्रयत्न झाला परंतु सुदैवाने मोठी घटना टळली. मात्र या पूर्वी 16 बळी गेले होते 17 आणी 18 वे बळी वाचले नेहमी प्रमाणे 1 दिवस आरडा ओरडा बैठक आणी पुन्हा तेच हे होणार च आहे हे प्रकार का घडत आहे तर वाळू वाल्या लोकांना जस पाहिजे तस वातावरण प्रशासन तयार करत या वेळी सुद्धा गेवराई तहसीलदार खाडे यांनी वाळू नसताना जप्तीचे एकाच जनाला 10 टेंडर करून दिले तसेच जास्त वेळ वाळू उपसा ला मिळावा म्हणून अगोदर 5 ताबा आणी नंतर 5 गाव जाणीवपूर्वक ठेवले आणी त्या जप्ती टेंडर आधारे सर्व हयावा वाल्याकडून मदत मिळवली त्यामुळे जवळ पास 100 विना नंबर हायावा रोडवर सुसाट धावत आहेत त्यांना माहिती त्यांनी सर्वाची भेट घेतली असल्याने काय पण करा प्रशासन सोबत आहे आणी त्यामुळेच काल चा प्रकार झाला तेव्हा वाळू नसताना जप्तीचे टेंडर करून ही गंभीर परिस्तिथी निर्माण करणाऱ्या तहसीलदार व विना नंबर हायावा 2 वर्ष पासून रोड वर धावतात तरी काही न करणाऱ्या आर टी ओ यांना सहआरोपी करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आहे.
गेवराई तालुक्यात 100 च्या आस पास विना नंबर हायवा तसेच गोदावरी पात्रात जेसीबी केणी च्या सह्याने प्रचंड अवैध वाळू उपसा दिवसा चालू आहे त्यात मग थोडी ओरड झाली की एखादे वाहन पकडायचे काही वाळू नसली तरी वाळू जप्त दाखवायची त्याच्या मोठ्या बातमी करून घायच्या वाळू वाहतूक करणारे फार डेंजर असे चित्र निर्माण करायचे वाळू वाल्या सोबत बसून मी मारल्या सारखं करतो तू रडल्या सारखं कर या नुसार महिन्याला जवळ पास शासकिय रेट नुसार तबल 5 कोटी पेक्षा जास्त शासन चे नुकसान करून स्वतः व्यवस्थित करून घ्याच हा धंदा गेवराई मध्ये चालू आहे.
कागदवार जप्त केलेली पण प्रत्यकशात नसलेल्या वाळूचा लिलाव करायचा लिलाव घेणाराणा माहिती असत वाळू नाही पण कागद ला कागद लावण्या साठी पावती मिळवण्यासाठी लिलावं घायचा तो पण महसूल ठरवणार कोणाला दयाचा मग पावती साठी जिल्हाधिकारी कार्यलत सर्व टेबल ला खुश करून पावती मिळवयाची आणी पावती आली की थेट गंगेतून बेसूमर उपसा करायचा गावाकऱ्यांना दादगिरी करायची प्रशासन पूर्ण मॅनेज असल्याने लोक तक्रार करून थकले कारण ही साखळी थेट आयुक्त कार्यलय पर्यंत असल्याने काही होत नाही हे लोकांना माहिती आहे आणी काल जे घडल ते याच विषय मूळ घडले आहे.
काय जोक आहे महसूल मंत्री यांनी ग्राहकांना 600 रु ब्रास वाळू देणार होते त्याचे टेंडर हे प्रशासनाने केले नाही केले जाणीवपूर्वक पावसाळा च्या तोंडावर केले कुणी घेऊ नये याची खबरदारी घेतली व बीड जिल्हा तील लोकांचे नुकसान केले वाईट याच वाटत एकही लोक प्रतिनिधी ला याच काही देण घेणं नाही तिकडे नगर आणी नाशिक संभाजीनगर जिल्हातील लोकांना 600 रु ब्रास ने वाळू मिळत आहे आणी आपल्या कडे जवळ गोदावरी असताना 5000 ब्रास ने वाळू घ्यावी लागत आहे.
 या आधी 50 च्या आसपास अपघात घडले 16 लोक देवाघरी गेले आणी कालचे सुदैवाने वाचले पण या पूढे हे टाळवे लागेल आणी त्या करिता वाळू वाल्या सोबत असणारे त्यांचे खरे भागीदार महसूल प्रशसना वर कारवाई करावी लागेल जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आरोपी केल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही म्हणून यात तहसीलदार खाडे व आर टी ओ यांना सह आरोपी करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी