बांधकाम विभागाच्या विरोधात मनसेचे झिरमाळ्या आंदोलन.
आष्टी /बीड ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील पूरहानी दुरूस्ती,एफ.डी आर,ए.एम.सी, पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसळंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत गेलेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करून ही सदर निकृष्ट कामांची विभागीय गुणनियंत्रण पथकामार्फत तपासणी न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 बीड यांच्या कार्यालयावर सर्व निवेदनाच्या झिरमाळ्या लावून आंदोलन केले दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास यांनी व्यक्त केला या आंदोलनावेळी सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, किशोर डोमकावळे आदी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी घेतला.
Comments
Post a Comment