शेतकरी संघटनेच्या वतीने अंभोरा ता.आष्टी येथे शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली सभेचे आयोजन
आष्टी (प़तीनिधी -गोरख मोरे ) : देशाचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी संसदेत 'सेंगोल' स्थापन करण्यात मश्गुल असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिन्यात सुमारे ३४ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे.त्यानिमित्ताने मौजे अंभोरा ता.आष्टी जि.बीड येथील अंबेश्वर मंदिरात १ जून २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली सभा आणि चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे.बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, युवा आघाडीचे रामेश्वर गाडे, जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, अनुरथ काशीद उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती युवा आघाडी आष्टी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गुंड यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका कांदा आणि दुध उत्पादनात अग्रेसर आहे.अधिक शेती उत्पादन काढून सुध्दा सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांना बाजारात हार पत्करावी लागत आहे. शेतीमालावर निर्यातबंदी घातल्याने दुध,भाजीपाला,कांदा,सोयाबीन, कापूस, करडी, हरभरा मातीमोल भावाने विकावा लागल्याने नुकसान झाले. सततच्या नुकसानीमुळे जगण्यात निराशा येणे स्वाभाविक आहे.शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय समस्या तयार झाली आहे. मात्र याकडे सत्ताधारी आणि विरोधक जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. शेतीव्यवसायातील गुंतवणूक थांबली असून लेकराबाळांची लग्ने खोळंबली आहेत.यावर बैठकीत चिंतन अपेक्षित आहे.
शेती व्यावसायाशी प्रामाणिक असलेली काबाडकष्ट करणारी आपल्या हाडा मांसाची, जिवलग माणसं अशा पद्धतीने जग सोडून जात आहेत.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख रहेमान सय्यद, रिजवान बेग,भिमराज झगडे, स्वप्निल थेटे, परमेश्वर घोडके,प्रा.राम बोडखे,संतोष गुंड, विजय आटोळे, मोहनराव ओव्हाळ, सागर आमले (सरपंच अंभोरा), विष्णू मांढरे,संजय खटके, कासम शेख,बंडूआपा देवकर,शहानवाज पठाण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment