Posts

Showing posts from November, 2022

कारागृहातील कैद्याकडुन खाजगी कामे वाहन धुवायला लावले; कारागृह महानिरीक्षक यांना तक्रार कारवाईची मागणी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

Image
बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन कैद्याला खाजगी चारचाकी वाहन धुऊन घेण्याचा प्रकार उघडकीस आला असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना केली आहे.  जिल्हाकारागृहातील कैद्याकडुन आधिका-यांना कोणतीही खाजगी कामे करवुन घेता येत नसुन ते आचारसंहीतेचे उल्लंघन आहे मात्र बीड जिल्हा कारागृहातील आधिका-यांकडुन खाजगी वाहन क्रमांक एमएच १६ बीएच ८५०८ ही कैद्याकडुन धुत असल्याचे छायाचित्र हाती लागले असुन हे मानवी आधिकाराचे उल्लंघन असून संबधित प्रकरणात चौकशी करून जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडु नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बीड, अधीक्षक जिल्हा कारागृह बीड यांच्यामार्फत सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा मह...

शितल भवरे यांनी राबलेल्या दारूबंदी अभियान महाराष्ट्रभर राबवण्यासाठी राज्यभरातील महिलानी आडवी बाटली" करण्यासाठी पुढाकार घ्यावा

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नांदेड मधील प्रभाग क्र.१७ मध्ये पवित्र गुरुद्वाऱ्याचा परिसर येतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, प.पु. बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भगवान महावीर यांचे मंदीर, हनुमान मंदिर, शितलादेवीचे मंदिर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा, महाकाली मातेचे मंदिर, पोच्चम्मा मातेचे मंदिर, असून ह्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद परिसर,मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधिक्षक कार्यालय,पोलीस अधिक्षक निवासस्थान, शासकीय दवाखाना, खाजगी डॉक्टरांची वसाहत, मा.धर्मादाय आयुक्तांचे कार्यालय,जीएसटी भवन, भगवान महावीर स्तंभ, जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज हायस्कूल, के.आर.एम.महिला महाविद्यालय, आंध्रा समिती स्कूल, गुजराती हायस्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल असे अनेक महत्त्वाचे स्थळ असताना ही ह्या भागात सहज पणे दारु मिळत असल्याने लहान मुले मुली व महिला भगिनींना प्रचंड ञास सहन करावा लागत असल्यामुळे शितल भवरे यांनी ह्या भागात दारूमुक्त करण्यासाठी भवरे यांनी "दारूबंदी अभियानाचा लढा उभ...

चऱ्हाटा येथे भारतीय संविधान दिन साजरा

Image
बीड प्रतिनिधी .:-बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे धम्मदीप बुद्ध विहारात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच हनुमान ससाणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष शाहू आप्पा डोळस हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच हनुमान ससाणे आणि शाहू डोळस यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुढे बोलताना वक्त्यांनी संविधान निर्माण आणि उद्देश यावर प्रकाश टाकला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुदाम ससाणे, चंद्रभागा ससाणे, ग्रा. पं. सदस्य खंडू खंडागळे, माजी सदस्य लहू ससाणे, विजय साबळे, भागवत साबळे, लहू खंडागळे, पप्पू इंगोले, अंगणवाडी ताई कुसुम ससाणे, नंदुबाई दैठणकर यांच्यासह महिला आणि लहानथोर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गावातील भिमसैनिक मुकेश ससाणे यांनी केले होते.

बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा नाही तर बीड जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा झाला पाहिजे - प्रा.प्रदिप रोडे

Image
  नालंदा करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा बॅचचा उत्साहामध्ये शुभारंभ  बीड(प्रतिनिधी ):-. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा नाही तर बीड जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे असे मत नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी व्यक्त केले. नालंदा करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा बॅचचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तुलसी आय.टी कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशनचे बीडचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.रवींद्र कोलप (निवृत्त अध्यक्ष अभियंता महावितरण, बीड), मा.संदीप उपरे (राज्याध्यक्ष,सत्यशोधक ओ.बी.सी परिषद, महाराष्ट्र राज्य),प्राचार्य.डॉ. पांडुरंग सुतार (जीवनदीप महाविद्यालय,पिंपळनेर),प्रा.डॉ. भिष्मा रासकर (निवृत्त प्राध्यापक, बीड), करनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विशाल नवले,प्रा.डॉ.नंदकुमार उघाडे,प्रा.सुमित वाघमारे यांच्या सह स्पर्धा परीक्षा तयारी कर...

मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येथे आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली

Image
.                  प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करा असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.       विमा कंपन्यांकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विमा मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांनी विचारात घेण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्याची कार्यवाही प्रलंबित ठेवू नये. नोंदणी केलेला कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून आणि विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करुन मंत्री श्री. सत्तार यांनी, विमा कंपन्यांनीही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.       यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, क...

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण; सर्वर हँग: रात्र- रात्र जागून भरावा लागत फॉम

Image
सोयगाव/ प्रतिनिधि मुस्ताक शाह : तालुक्यासह देव्हारी सावळदबारा , नांदा तांडा, येथील महा ई- सेवा केंद्रावर राज्य सरकारच्या पोलीस भरती प्रकियेत ऑनलाईन अर्ज करण्याची केवळ ३ दिवस उरले मात्र संबधित कंपनीचा सर्वर सतत हँग होत असल्याने रात्र -रात्र बसवून उमेदवारांना अर्ज भरावा लागत आहे. त्यांमुळे भावी पोलिसांना आतापासूनच   नाईट ड्युटी लावण्याची चित्र दिसून येत आहे.  या हँग ओव्हरमुळे दहा दिवस अर्ज मदत वाढवावी अशी मागणी होत आहे.  राज्य सरकारने पोलिस शिपाई १४ हजार ९५६ जागा  पोलिस चालक २१७४ जागा व सशस्व राज्य राखीव  दल १२०१  जागा या तीन विभागामध्ये भरती प्रकिया सुरू केली आहे.  सुरूवातीला ३ ते ३० अशी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतू वयोमर्यादेतील बदल करण्याचा ऐनवेळी साक्षात्कार झाल्याने अनेकांनी पोलिस भरती होण्याचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांतच सेवा केंद्रावर मोठी अडचण निर्माण होत असून विद्या...

ग्राम पंचायत निवडणूक विषयी राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचे वीचार

Image
ग्राम पंचायत निवडणूक विषयी राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचे वीचार     ग्रामपंचायत निवडणूक २०२२ विषयी.... .१) गद्दाराना पानी पाजू २) रंग बदलणाऱ्या गिर्गिटाना जागा दाखवून देऊ ३) निष्क्रिय लोकांना खाली बसवू ४) बदल हा निसर्गाचा नियम आहे तो झालाच पाहिजे त्याचबरोबर प्रत्येकाची उमेद ही पाहू ५) निवडून आल्यावर फक्तं स्वतःच्याच पात्रावर वाढवून घेणाऱ्यांना पंगतीतून बाहेर काढू ६) आपला तुपला करणाऱ्याला,सर्वसमावेशक काम न करणाऱ्याला, जातीयवादी मनुवादी विचार सरणीच्या सडक्या वृत्तीच्या लोकांना बाहेर काढू ७) अन्नाची शपथ वाहून बेईमान होणाऱ्या आणि वेळप्रसंगी स्व चा विचार करणाऱ्या स्वार्थी मतलबी लोकांना जागा दाखवू.८) गावचा खेळीमेळीने,विकासात्मक, वैचारिक, सांस्कृतिक, शैशनिक वारसा पुढे चालवनाऱ्या लोकांना नक्कीच पाठिंबा देऊ.९) गावागावात चुगल्या,घरफोड्या, बंधूफोड्या अश्या 'फोडा आणि जोडा' अश्या मनुवादी विचारसरणी च्या लोकांना जरा लांबच ठेऊ.१०)मैत्री, राजकरण,समाजकारण, समानता, सार्वभौम, स्वतंत्र, बंधुता, न्याय आणि एकात्मिक विकास करणाऱ्या व त्याचे सामर्थ्य असणाऱ्या गाव बंधुला...

महाराष्ट्राचा भाग असलेले बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला - छगन भुजबळ

Image
कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' - छगन भुजबळ महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची आवश्यकता - छगन भुजबळ नाशिक,दि.२९ नोव्हेंबर :- महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बेळगाव विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,भारत हा एकसंघ देश आहे. शांततेच्या मार्गाने जर कुणी निदर्शने करत असेल तर त्यांच्यावर गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. बेळगाव मधील नेतेमंडळी कठोर आणि क्रूर अशी भूमिका घेत आहे ती अजिबात योग्य नाही. कर्नाटक मध्ये बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कर्नाटक मधील नेत्यांकडून होत असल्याची ट...

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सवामध्ये अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथील 2 विद्यार्थ्यांची निवड

Image
आष्टी प्रतिनिधी 24 वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सव-2022 चा आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे दि. 03/12/2022 ते 07/12/2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. या क्रिडा स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संघाच्या खो-खो क्रिडा संघामध्ये अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथील कु. सुशांत जगदीश झाडपिडे आणि कु. आशय दादासाहेब ढोले या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना डॉ. खेमगर बी. बी. आणि प्रा. कनसटवाड ए. एस. यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सवामध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भीमरावजी धोंडे,संचालक डॉ.अजय (दादा) धोंडे,प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत, प्राचार्य साईनाथ मोहळकर, प्रा.पवार एम. पी.,प्रा. कनसटवाड ए.एस., प्रा.चित्ते ए.एस., डॉ. मुसळे एस. व्ही., प्रा. अडसरे ए. डी.,प्रा. माहुरे एस. एस., प्रा.सरवदे एस.के.यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा:-कॉ.महादेव नागरगोजे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने चुंबळी येथील विध्यार्थींच्या शिक्षणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत असल्याने कॉम्रेड महादेव नागरगोजे व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत याकडे लक्ष वेधले आहे.  शासनाच्या वतीने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावखेड्यात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे १ ते ७ वी प्रर्यंत शाळा असुन तेथील विद्यार्थ्यांची ९६ पटसंख्या असुन तेथे ७ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक्षात तेथे २ दोनच शिक्षक उपलब्ध असतात व बाकीचे शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. त्यामध्ये काही शिक्षक दारू पिऊन उपद्रव माजवित असल्याचेही प्रकार घडत असुन याबाबतीत पालकांच्या वतीने विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून याकडे गटशिक्षणाधिकारी यांनी लक्ष देऊन सतत दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा...

मालकी हक्कासाठी क्रांती संघटना आक्रमक

Image
मालकी हक्कासाठी हल्लाबोल, "पी आर कार्ड आमचं हक्काचं नाही कोणाच्या बापाचं" घोषणेने जिल्हाधिकारी परिसर दणाणला औरंगाबाद प्रतिनिधी :  गुंठेवारी, झोपडपट्टी, दलित वस्ती, गायरान वरील वसाहती व अनधिकृत वसाहती यांना अधिकृत करून मालकी हक्काचे मालमत्ता पत्रक (पी.आर.कार्ड) देण्यात यावे यासाठी क्रांती संघटनेचे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जन आंदोलन करण्यात आले. यावेळी क्रांती संघटना अध्यक्ष राहुल भाऊ साळवे, दिनकरदादा ओंकार,ए आर वासनकर,रतनकुमार पंडागळे,अमित भाऊ वाहूळ, अरविंद कांबळे, रेखाताई राऊत, विजय वाहूळ, आनंद भाऊ बोर्डे, आनंद चांदणे, रमेश मगरे, नीताताई दाभाडे, वंदना बोर्डे, रवी बनकर, सचिन दाभाडे, कपिल बनकर, विशाल रगडे, सुहास त्रिभुवन, सोनू गवई, प्रभू राऊत, नितीन दाभाडे, प्रभू बोर्डे, राजू सुरडकर, मनीषाताई बुटे, गणेश साळवे, प्रभाकर बोर्डे, सतीश जाधव, सोमनाथ जाधव, अजय साळवे, तुषार आदके, सुरेश मगरे, प्रवीण खरात मीनाताई मिसाळ, मीनाताई काकडे, कांता अहिरे, अजय गाडे, मोहन गायकवाड, अमोल वाघ, अड्डू पठाण, अमोल दांडगे, असेफ पठाण, अनु जब्बार, राहुल सरोदे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व हज...

घरात घुसून मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातुन आष्टी / बारामती येथील आरोपीची निर्दोष मुक्तता

Image
 बीड प्रतिनिधी :- प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की , वाकी ता . आष्टी जि.बीड येथील संभाजी खवळे दिपीका खवळे व शारदा खवळे हे बारामती येथील गणेश रंदावणे यांच्या विटभट्टीवर मजुर म्हणुन काम करण्यासाठी होते . त्यांनी पंधरा दिवस विटभट्टीवर काम केले व ते वाकी ता.आष्टी जि.बीड येथे निघुन आले परंतु उचल घेतलेली रक्कम रु . 65,000 / - रुपये परत न करता व ते काम न करता तेथुन परत आले होते . त्यांच्याकडील उचलीचे पैसे मागण्यासाठी दिनांक 21/01/2019 रोजी रमेश हरिचंद्र चौरे रा . डोंगरगण ता . आष्टी जि.बीड व गणेश अविनाश रंदावणे रा . बारामती जि.पुणे यांनी शारदा देविदास खवळे रा . वाकी यांच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून शारदा देवीदास खवळे व घरातील इतर लोकांना मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप आरोपीवर होता . सदरील फिर्यादीवरुन पो.स्टे . आष्टी येथे गु.र.नं. 25/2019 हा गुन्हा नोंद झाला व यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे , मंदार नाईक , भास्कर सावंत यांनी या प्रकरणात तपास केला व मा . विशेष जिल्हा व सत्र न्यायालय , बीड येथे स्पेशल अॅट्रॉसिटी केस नं . 11/2019 दोषारोपत्र हे मा . न्यायाल...

येवल्यातील भुमीपुत्र महेंद्र पगारे यांचा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला

Image
निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध अनमोल कार्य करणाऱ्या मान्यवरांना क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य राजेखान शानेदिवाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा.अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस माजी खासदार निवेदिता माने डाॅ सुरेश जाधव मा. विजया कांबळे मा. अनिल म्हमाने लेखक डाॅ. खंडेराव शिंदे उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध भागात शैक्षणिक व सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांना राजश्री शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतील मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कारासाठी 800 हुन अधिक प्रस्ताव आले असताना त्यात येवला तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते स्वारीपचे तालुकाध्यक्ष तसेच अनकुटे सावखेडे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेंद्र पगारे या...

मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नेहमीप्रमाणे दाखवली कर्तव्यतत्परता

Image
"त्या" गल्लीची केली पाहणी, नाली बनविण्याचा दिला शब्द;नागरिकांनी मानले आभार ! बीड (प्रतिनिधी ) - आठ दिवसांपूर्वी "स्वर्ग मिळावे म्हणून नमाज़साठी जाताना नरक यातनेचा अनुभव ! मुख्याधिकारी साहेब प्रभाग क्रमांक १८ मधील या पाच फुटाच्या गल्लीत एकदा याच ..." या शीर्षकाने मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून  बातमी दिली होती. याची दखल घेऊन बीड नगरपरिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत नेहमीप्रमाणे आपल्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची प्रचिती दिली. तसेच या गल्लीत नाली बनवून देऊ असा शब्द दिल्याने उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचे आभार मानले.            गेल्या अनेक महिन्यांपासून शहेंशाहवली दर्गामागे असलेल्या दर्गा तलाव पासून जवळ न्यू शहेंशहानगर परिसरातील मस्जिद मध्ये जाण्यासाठी नागरिकांना जी पाच फुटाची गल्ली एकमेव मार्ग आहे. त्यातही पलीकडच्या परिसरातील नाल्याचे गलिच्छ पाणी या गल्लीतून नाली सारखे २४ तास धो-धो वाहत असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास स...

औरंगाबाद येथे आयोजित कृत्रिम हात पाय बसवि त्याचे मोफत शिबिराचे उद्घघाटन कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न

Image
औरंगाबाद येथे आयोजित कृत्रिम हात पाय बसवि त्याचे मोफत शिबिराचे उद्घघाटन कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले , शिबिरात उपस्थित दिव्यांगाना ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कृत्रिम हात पाय वितरण करण्यात आले, नोंदणी झालेल्या जवळपास 176 दिव्यागाना या शिबिरात लाभ देण्यात आला सोयगाव ( प्रतिनिधी ,.यासीन बेग )          ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ( बाबूजी ) यांच्या जन्मशताब्दी निमित्त साधू वासवाणी मिशन पुणे आणि लोकमत समूहाच्या संयुक्त विद्यमाने लोकमत भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, साधू वासवाणी मिशनचे महाप्रबंधक सुंदरजी वासवाणी, दैनिक लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, सिल्लोड न.प.तील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेता नंदकिशोर सहारे , नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सिटी डेकोरेटर्सचे संचालक मनोज बोरा, कृत्रिम हात - पाय तज्ञ डॉ. सुनील जैन, लोकमत समाचार चे संपादक अमिताभ श्रीवास्तव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी...

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुंबई,दि.२८ नोव्हेंबर :- मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली. या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रा समवेत लावण्यात यावीत अशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भुजबळांनी याबाबत चर्चा केली अ...

जैन धर्मशाळा नांदगाव येथे दिगंबर जैन संत आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांचे मधुर प्रवचन मालिके प्रसंगी आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थिती लावली.

Image
    आमदार साहेबांनी याप्रसंगी पुलक सागर जी महाराजांचे दर्शन घेत भगवान महावीरांची प्रतिमा भेट दिली तसेच महाराजांनी आमदार साहेबांना पुस्तिका भेट दिली.      याप्रसंगी बोलताना आपला देश जर प्रगती करत असेल तर आपल्यासारख्या धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तींमुळेच हे शक्य आहे असे आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी मत व्यक्त केले.      आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याप्रसंगी पुलकसागरजी महाराज यांनी नांदगाव शहरात येऊन धर्माची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल स्वागत करत आभारही मानले. नांदगाव शहरात अहिंसा चौकाची निर्मिती करण्याचे उद्देश फक्त त्या स्तंभाकडे पाहून योग्य दिशा, योग्य आचार व योग्य विचार करण्याची प्रेरणा मिळावी हाच उद्देश्य असल्याचा यावेळेस आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले.    याप्रसंगी नांदगाव शहरातील जैन धर्मीय बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते मतदार संघात मोठ्या प्रमाणात सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

Image
     नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट *आमदार सुहास आण्णा कांदे* यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावर भव्य सभामंडप मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व सभामंडपांचे भूमिपूजन आमदारांच्या सूविद्य पत्नी सौ.अंजुमताई कांदे   यांच्या हस्ते करण्यात आले.               शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर व रविवार दिनांक 27 नोव्हेंबर या दोन दिवशीय कार्यक्रमात हे सर्व भूमिपूजन करण्यात आले.    गावा गावात फटाखे, ढोल ताशांच्या गजरात, अती उत्साहात, मोठ्या संख्येने नागरिकानी गर्दी करत सौ.अंजुम ताई कांदे यांचे स्वागत केले.     सौ.अंजुम कांदे या प्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक गावात नागरिकांशी संवाद साधला. आमदार साहेब सतत मतदार संघाच्या विकासाकरिता जागरूक आहेत, आम्ही सर्व प्रत्येक सूख दुःखात आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.       आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सभामंडप सह स्वखर्चातून प्रत्येक आदिवासी वस्तीवर भगवान एकलव्य मूर्ती तसेच बंज...

मालेगावी पुरोगामी साथीनी केला संविधान जागर

Image
मालेगाव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान स्वीकृती दिन निमित्ताने मालेगावमधील राष्ट्र सेवा दलासह विविध संघटनांच्यावतीने संविधान फेरी काढून संविधान जागर करण्यात आला. महात्मा गांधी यांचे पुतळा, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करीत संविधान चौक, किडवाई रोड येथील अशोक स्तंभास अभिवादन करून फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी सर्वानी संविधान प्रास्ताविका म्हटली. गीता बायबल हो या कुराण सबसे बडा संविधान, लोकशाही जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर संगमेश्वर येथील सत्यशोधक मैदान सर्व कार्यकर्त्या सोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मालेगावचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी संवाद साधला. सर्व कार्यकर्त्याना नचिकेत कोळपकर यांचे तर्फे संत तुकारामाच्या अभंगाचे पुस्तक ताऊ परदेशी यांचे हस्ते भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, जेष्ठ सेवा दल सैनिक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, मोरेश्वर जोशी, सिद्धार्थ मगरे, अतुल मोरे, विशाल पवार, संतोष पवार, नसीम अहमद, मयुर वांद्रे, सलीम शेख, सतीश शेवाळे, अनिल देव...

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली

Image
सोयगाव ( प्रतिनिधी . ) दि , 26, 11, सोयगाव येथील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली . बाळासाहेबांची शिवसेनेच्या- वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका प्रमुख प्रभाकर आबासाहेब काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,जि प सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,नगरसेवक भगवान जोहरे, हर्षल काळे,गजानन कुडके,बाबू चव्हाण,राजु दुतोंडे,कदिर शाह,मंगेश सोहनी,वसंत राठोड,श्रावण जाधव,प्रताप जाधव,दत्तू इंगले,भारत तायडे,अरुण वाघ,चंद्रकांत सोनवणे,अमोल मापारी,हर्षल देशमुख,श्रावण राठोड,शेख बबलू,गजानन बदक,बापू कोथळकर, अशोक ढगे, बाळू आगे,योगेश वामणे,राजू म्हस्के,सुरेखा तायडे,सुशीलताई इंगळे,राजेश सोनवणेआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने येथील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

Image
बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने येथील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोयगाव (प्रतिनिधी,यासीन बेग )  तालुका प्रमुख प्रभाकर आबासाहेब काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,जि प सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,नगरसेवक भगवान जोहरे, हर्षल काळे,गजानन कुडके,बाबू चव्हाण,राजु दुतोंडे,कदिर शाह,मंगेश सोहनी,वसंत राठोड,श्रावण जाधव,प्रताप जाधव,दत्तू इंगले,भारत तायडे,अरुण वाघ,चंद्रकांत सोनवणे,अमोल मापारी,हर्षल देशमुख,श्रावण राठोड,शेख बबलू,गजानन बदक,बापू कोथळकर, अशोक ढगे, बाळू आगे,योगेश वामणे,राजू म्हस्के,सुरेखा तायडे,सुशीलताई इंगळे,राजेश सोनवणेआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी.येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन

Image
आष्टी प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी.येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्यात आले अभिवादन कार्यक्रमानिमित्त प्रमुख व्याख्याते प्रा.संभाजी झिंजूर्के सर उपस्थित होते ,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए.एन.गायकवाड सर, यांनी , महात्मा फुले यांच्या कार्याचा गुणगौरव केला , बहुजन समाजातील मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडे वाडा येथे 1जानेवारी 1848 रोजी सुरू केली , विधवा पुनर्विवाह ,सती कायदा बंद केला , बहुजनातील अठरा पगड जातींच्या लोकांना शाळा ,शिक्षण , आणि महिलांना न्याय , मिळवून देणारे म्हणून पाहिले सत्यशोधक म्हणून महात्मा फुले यांना जगभरात ओळख आहे पुढे अध्यक्ष समरोप निमित्त प्रा.संभाजी झिंजुर्के सर यांनी स्मृतीदिनानिमित्त , 21व्या शतकातील विद्यार्थी विद्यार्थिनी ,महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख , व जाणीव असली पाहिजे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजातील मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली .बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी ,आणि सती प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाह सुरू केला , या कार्य साठी त्यांना सामाजिक त्रास झाल...

कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Image
आष्टी प्रतिनिधी कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे सत्य शोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणासाठी,समानता व सत्यासाठी देह झिजवणारे,सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे ,शोषित-वंचिताना आवाज देणारे,दिन दलितांचे कैवारी, पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी करणारे भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक होते. “विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।" अश्या प्रभावी कवितेच्या माध्यमातून नागरिकांना शिक्षणास प्रोत्साहित केले तसेच शिक्षणाचा तळागाळापर्यंत प्रचार अन् प्रसार केला. यावेळी प्रा. माहुरे एस. एस. यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की महात्मा फुले एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यभर दुर्लक्षित जात, म...

दुर्मिळ असलेला 'निवडुंग' रानमेवा आरोग्यासाठी पोषक

Image
दुर्मिळ वनस्पती चाखण्याचा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना योग आष्टी (प्रतिनिधी ) अगदी प्राचीन,मध्ययुगीन ग्रंथातील ज्यांचा उल्लेख आला आहे अशी दुर्मिळ वनस्पती म्हणून आणि रानमेवा म्हणूनही प्रसिद्ध असलेले निवडुंग हे फळ अत्यंत काटेरी असते असे असले तरी ते आरोग्यास उपकारकारक असल्याची चर्चा आहे.दरम्यान या निवडुंग वनस्पतीची चव चाखण्याचा योग काल आष्टी येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आला.आष्टी येथील विविध ग्रुप आपल्या आरोग्यासाठी म्हणून सकाळी विविध मार्गांवर धावत आणि चालत असतात.असाच सुप्रभात माॕर्निंग ग्रुपचे सदस्य आष्टीचे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे नेते तथा पत्रकार अण्णासाहेब साबळे हे मॉर्निंग वाक करीत होते.मॉर्निंग वाॕक करीत असतानाच आष्टी येथून काही अंतरावर असलेल्या परिसरामध्ये निवडुंग नावाचा वनस्पतीचा रानमेवा त्यांच्या दृष्टीक्षेपास पडला.वाचनात आल्यानुसार त्यांनी तात्काळ त्या निवडुंग वनस्पती अत्यंत काटेरी झुडपातून त्यांनी काढली आणि त्या लालबुंद अशा फळाला चाखण्याचा योग त्यांना आला.हे निवडूंग वरून अत्यंत काटेरी असले तरी आतून मात्र अत्यंत मऊ ग...

हेळंब येथे खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव आजपासून प्रारंभ

Image
पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- तालुक्यातील मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा  यात्रेस मंगळवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे.       हेळंब येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. या निमित्त मंगळवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. बुधवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी , दि.1 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे.      हेळंब येथे जागृत असे श्री.खंडोबाचे मंदिर ...

पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी पद भरती सरस बोगसगिरी

Image
बोगस तात्काळ थांबवा हरिदास शेलार.भगिरथ बांड,अशोक थोरात, अमोल पारवे योगेंद्र पारवेकर यांची मागणी  बीड / प्रतिनिधी आपण सिनर्जिज सोल्युशन प्रा. लि. कंपनी अंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पशुधन पर्यवेक्षक(L.S.S.) या पदाची जी कंत्राटी पध्दतीने दिनांक 11/11/2021 पासून ते दि 24/09/2022 पर्यंतची केलेली निवड ही अयोग्य मार्गाने केली आहे. ती तात्काळ थांबवावी.1) पशुधन पर्यवेक्षक(L.S.S.) हा डिप्लोमा सन 2007 मध्ये शासनाने बंद केलेला आहे. (यांचे विषय 1) औषधीशास्त्र, व शल्य चिकित्सा 2) विकृती व सुक्ष्म जीवशास्त्र 3) भीषकशास्त्र 4) पशुप्रजनन असे विषय होते.2) सन 2007 च्या नंतर LMDP हा डिप्लोमा शासनाने दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करण्यासाठी चालू करण्यात आला आहे. पशुधन पर्यवेक्षकाL S.S.) यासाठी नाही. (1) गायम्हैस पालन व दुध उत्पादन 2) दुधाचे गुण नियंत्रण 3) दुधाची स्त्री व विक्री 4) दुधजन्य पदार्थ निर्माती व तंत्रज्ञान 5) शेळी, मेंढी व वराह पालन 6) कुक्कटपालन 7) कृत्रिम रेतन.3) शासकीय पशुधन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना व संबंधित मर्जीतील व्यक्तींना त्यांचा पशुधन पर्यवेक्षकाLS....

भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा - स्वराज्य संघटनेची मागणी.

Image
गेवराई/प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झालेपासून महाराष्ट्र राज्य, महापुरूष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता यांबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत.  आपल्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळ केलेला आहे.  यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे.  महोदय, आम्ही आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदया व माननीय पंतप्रधान महोदय यांना कळवू इच्छितो की, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो.सदर निवेदनाची दखल घ्यावी व भगतसिह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अन्यथा महाराष्ट्रात जनआंदोलणाच्...

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना MGM विद्यापीठातफेॆ॓ मरोनोत्तर मानद डी.लिट ही पदवी प्रदान

Image
 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा डंका  पुन्हा एकदा वजला . हा क्षण आमच्यासाठी खुपच आनंदाचा आहे .इथल्या वेवस्थेने अण्णा भाऊना उपेक्षित ठेवल . MGM विद्यापीठाने यथोचित सम्मान केला . त्याबद्दल समस्त लोकशाहिर अण्णा भाऊ साठे अनुयाकडून लाख लाख आभार . अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे यानी यावेळी उपस्तित राहुन डी. लिट मानद ही पदवी स्वीकारली या वेळी अण्णा भाऊ साठे यांचे नातू आदरणीय . सचिन भाऊ साठे आणि अण्णा भाऊ यांचे नात जवाई आदरणीय गणेशजी भगत आदी कुटुंब  उपस्तित होते .

आरोग्यमंत्र्याचे खाजगी सचिव सत्कारित

Image
चौसाळा -माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद शहराचे पालकमंत्री त्यांचे खाजगी सचिव श्री कृष्णा जाधव साहेब हे बीड वरून उस्मानाबाद कडे जात असताना काही कामानिमित्त चौसाळा शहरांमध्ये आगमन होताच त्यांचा शहरातील बालाघाटावरील कार्यकर्त्यांनी थाटात सत्कार व सन्मान केला. यावेळी डॉक्टर दिलीप मोठे,प्राध्यापक विलास भिलारे, जीवन नाना नाईकवाडे, अशोक नागरगोजे,राजू मुजावर, मुख्याध्यापक जलील सर ,बळीराम तोडकर ,विलास नाईकवाडे ,विक्रम सोनवणे, दीपक नाईकवाडे, प्रल्हाद सोनवणे ,पवन कुचेकर ,रफिक आतार ,सुरज सोनवणे, यांनी सत्कार केला शेवटी त्यांचे शकील सय्यद यांनी आभार मानले व चहापाणी करून कार्यक्रम संपला.

जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

Image
जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर   बीड जिल्हा पुरवठा व तहसिल कार्यालय बीड विभागातील ५००० रेशनकार्ड गायब अनागोंदी कारभार व टीपीवर (ट्रान्सफाॅर्मर परमिट) बोगस सह्या घेऊन धान्य काळ्याबाजारात विकणे,पुरवठादार व रेशनदुकानदार यांच्याकडुन संगनमतानेच ग्राहकांची आर्थिक लुट प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२८ नोव्हेंबर २०२२ वार सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "थाळीनाद आंदोलन "करण्यात आले. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्षबीडशेखयुनुसच-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुका सचिव मुश्ताक शेख , शेख मुबीन बीडकर,सय्यद आबेद बीडकर ,बलभीम उबाळे, जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे,आप तालुकाध्यक्ष भिमराव कुटे सहभागी असुन निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना देण्यात आले.  जिल्हा पुरवठा विभागातुन...

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Image
बीड प्रतिनिधी :- अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पुणे (आळंदी)येथे पळून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीस माननीय सत्र न्यायालय बीड यांनी सबळ पुराव्या अभावी आज निर्दोष मुक्त केले . याबाबत सविस्तर माहिती अशी की , अल्पवयीन मुलीने दिनांक 10 / 04/2018 रोजी फिर्याद दिली की ,दिनांक 05/06/2016 रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या नावावर ट्रॅक्टर व अर्धी शेती करतो असे म्हणून चुंबळी येथे नेले व तेथे जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले . त्यांनतर आरोपीने आळंदी येथे भाग्यश्री मंगल कार्यालय आळंदी येथे नेऊन दिनांक 29 / 06 /2016 रोजी एकमेकांना माळा घालून लग्न केले होते . त्यावेळी आरोपीचा भाऊ व बहिण उपस्थित होते अल्पवयीन मुलीचे आईनी दि.16/06/2016 रोजी मुलगी बेपत्ता झालेबाबत पोलीस स्टेशन चंकलबा येथे तक्रार दाखल केली . त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीस 02/07/2016 रोजी पोलीस स्टेशनला आणून सोडले व तेथे आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तसेच आई-वडिलांनीही तिला घरी नेण्यात नकार दिला त्यानंतर अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती मार्फत अंबाजोगाई येथे निरिक्षण गृहात सोडले होते . व सध्या मा...

म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित संविधान दिन बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  बदलापूर प्रतिनिधी :-संविधानाची माहिती सर्वाना व्हावी,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन सोहळा म्हाडा वसाहत कॉलनी , गार्डन शेजारी , बदलापूर ( पूर्व) येथे सायंकाळी प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त केंद्र अधिकारी डॉ.त्र्यंबक दुनबळे आणि प्रमुख मार्गदर्शक वक्ते कवी लेखक कायद्याचे अभ्यासक नवनाथ रणखांबे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .  कार्यक्रमाची प्रस्तावना करीत असताना उद्योजक सुभाष खैरनार म्हणाले " आम्ही भारतीय लोक, ! असं आपण म्हणतो तर आपले संविधान दिन साजरा करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही संविधान दिन आज साजरा करीत आहोत.  विचारवंत अभ्यासक यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होने महत्त्वाचे आहे म्हणून बुद्धिजीवी वक्ते यांचे मार्गदर्शनाचे आयोजन आज केले आहे. आमची संस्था समाजामध्ये वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी असे उपक्रम नेहमीच घेत असतो. कार्यक्रमात तरुणांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही वर्षेभर सगळे...

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबाचे ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन

Image
परळी प्रतिनिधी   : तालुक्यातील कौठळी येथील अंकुश गरड या तरुण शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्या कुटुंबाची ज्येष्ठ विधीज्ञ तथा समाजसेवक ॲड. माधव जाधव यांनी भेट घेऊन गरड कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी माधव जाधव यांनी दिले. परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचं सत्र चालूच असून कौठळी येथे अंकुश गरड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत व काही अडचण असेल तर बोलून दाखवली पाहिजे ज्यातून मार्ग काढता येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असे आव्हान याप्रसंगी ॲड माधव जाधव यांनी केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवाकराम जाधव सर, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष भागवत जाधव, मराठा सेवा संघाचे गंगाराम अण्णा जाधव, मंचकराव गरड, गोपाळ शिंगाडे, उत्तम गरड ,बळीराम गरड, सर्जेराव गरड यांच्यासह उपस्थित गावकरी उपस्थित होते. .

पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मुलांना मनस्ताप, वारंवार साईट होतेय हँग, - अजय काकडे

Image
बीड प्रतिनिधी:-नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय.  बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली आणि आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागतेय. बीडपासून 15 किलोमीटर असलेल्या जरुड गावामधील विद्यार्थी विजय अरुण काकडे हा रात्रीच्या वेळी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आला होता. मात्र दिवस उजाडला तरी त्याचा अर्ज सबमिटच झाला नाही. सातत्याने साईट बंद चालू होत असल्याने विजय सारख्या विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमध्ये बसून रात्र जागून काढावी लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना या डचनीचा सामना करावा लागतोय साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशनही झाले नाही. तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळ...

भुषण पवार व मित्र परीवारातर्फे रक्तदान शिबीर आनंदमय वतावरनात पार पडले

Image
बीड प्रतिनिधी: सध्या बीड जिल्हा रूग्णालयात रक्तपेढीत कमतरता असुन या जानिवातुन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा सहसंयोजक तथा बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष भुषण पवार यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली व मीत्रपरीवार यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी सतीष राठोड विजय चांदने राजेश चरखा डॅा बीराजदार आकाश राठोड दत्तात्रय राठोड रमेश राठोड विकास पवार बापुराव प्रभाळे दादासाहेब नन्नावरे अमोल तीडके बबन वाघमारे राहुल शिंदे नितीन आमटे हरीभाऊ नवले आन्णासाहेब बीडकर दिलीप बडे आदींनी परीश्रम घेतले तसेच जिव्हाळा अनाथालय येथे गरजूंना मदत व खाद्य वाटप केले…!

वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने संविधान दिन साजरा

Image
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपुज्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले भारतीय घटनेचे संविधान २६ नोव्हेंबर१९४९ संविधान दिवस  २६नोव्हेंबर२०२२ संविधान दिवस साजरा संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून साजरा करण्यात आला  यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड तालुका महासचिव किशोर भोले शहर अध्यक्ष दस्तगिर बबू शेख शज्हर महासचिव सतिष प्रधान अजय खरात राजकुमार गायकवाड सुदाम मोरे पत्रकार रघुनाथ थोरात कांबळे साहेब वंसत भोले सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन व आप वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
  पिंपरी येथे संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधान प्रस्तावना सार्वजनिक वाचून संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस. 26 नोव्हेंबर 2022 हा पक्षाचा 10 वा वर्धापन दिन या निमित्ताने पिंपरी चौक येथे आम आदमी पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली .      सायंकाळी ६ वाजता निगडी येथे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजयजी कुंभार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठा विजय संपादन करण असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर युवराज मठपती, श्रीकांत कदम, रोनाल्ड फिलिप्स, रेखा डोनगाव, यांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी आम आदमी पार्टीचे नेते डॉक्टर अनिल रॉय, आप शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर अमर डोंगरे, के.टी बारापात्रे, सुरेश बावनकर, किशन चावरिया, चंद्रमणी जावळे मामा, भिम मांगडे, सिताताई केंद्रे, प्रमो...

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष,तायक्वांदो चे प्रशिक्षण देणाऱ्या विभागाची दयनीय अवस्था

Image
बीड (प्रतिनिधी) - शहरातील एकमेव असलेल्या क्रीडा संकुलात ५ ते १५ वयोगटातील प्रशिक्षणार्थींना तायक्वांदो चे प्रशिक्षण देणाऱ्या विभागात लावलेल्या लाकडी फळ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठ्या प्रमाणात तुट-फूट झालेली आहे. यामुळे प्रशिक्षण घेता-घेता प्रशिक्षकांच्या गैरहजेरीत किंवा नजर चुकून जर लहान मुले व मुलींना दुखापत झाली किंवा काही अघटीत घडले तर याची जबाबदारी घेणार कोण ? असा प्रश्न येथे पाहणी केल्यानंतर मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला असून याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.              याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहरात अगोदरच क्रीडा संकुल आणि उद्यानांची वाणवा आहे. याला कारणीभूत आहे ते येथील राजकीय पुढारी आणि त्यांचे धोरण. येथे पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, त्यांना फक्त निवडून येईपर्यंत शहराचा व जिल्ह्याचा विकास करावासा वाटतो. निवडणुकांच्या प्रचारात जिल्हाभरातील सर्व पुढारी फक्त आपआपल्या तोंडातून विकासाच्या वाफा मोठ्या प्रमाणात सोडत...

पाटोदा येथे संविधान दिन मोठ्या उत्सहात साजरा

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधानाचा स्वीकार केला व 26 जानेवारी 1950 पासून आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य म्हणून अस्तित्वात आला. त्यामुळे आपण भारतीय खऱ्या अर्थाने या देशाचे शासक, सत्तधीश झालो. कारण या आधी आपल्या देशाने कारभार पहिला तो म्हणजे राजे महाराजे संस्थानिक किंवा परकीय आक्रमणकर्त्यांचा! म्हणून 26 नोव्हेंबर ला भारतात सामानतेच्या आधारावर कायद्याचे राज्य खऱ्या अर्थाने स्थापित झाले असे म्हणता येईल.देशामध्ये सर्व लोक मिळून मिसळून एकत्रित राहतात. पण समाजातील सर्वांचे विचार सारखेच असतील असे नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या राहणीमाणात, संस्कृतीमध्ये, खानपान, भाषा इत्यादी मधेही भिन्नता दिसून येते. पण असे असूनही सर्वांना एकाच धाग्यात गुंफण्याची भूमिका संविधान पार पाडते यामुळे पाटोदा तालुक्यात संविधान दिना निमित्त उद्देशिका वाचन,व्याख्यान,यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सर्व शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालय,विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे शनिवार दिनांक 26/ 11/ 2022 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

प्राथमिक आश्रम शाळा नाळवंडी येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
प्रज्ञासूर्य मित्र मंडळ[रमाई नगर] यांच्या वतीने आज प्राथमिक आश्रम शाळा नाळवंडी येथे विद्यार्थ्यांना २५० पेन वाटून संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा केला या वेळी संविधानाविषयी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.  यावेळी विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन वाटप करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला,आणि सर्व गुरुजन वर्गाना,आणि विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या....या यावेळी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे, आणि प्रज्ञासूर्य मित्र मंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते....

भारतीय संविधान जगात श्रेष्ठ -भाई गौतम आगळे सर

Image
परळी (प्रतिनिधी ) जगातील सर्व संविधाना पेक्षा भारतीय संविधान जगात श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी केले.‌ लोकशाही देशांमध्ये राज्यकारभार करण्यासाठी राज्यघटना असते. त्यामध्ये कायदेमंडळ, मंत्रिमंडळ , न्यायव्यवस्था व प्रशासन कसे असावे? तसेच राज्याचा उद्देश काय असावा? हे सांगितलेले असते. जवाहरलाल नेहरूंनी ऑस्ट्रेलियाचे विद्वान घटना तज्ञ जेनिंग यांना भारताची घटना लिहिण्यासाठी ठरविले होते. तेव्हा जिनिंगने असे म्हटले होते की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या कायदे पंडित भारतात असल्याने त्यांना संविधान लिहिण्यासाठी बोलवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितले होते की, संविधानामध्ये जर मागासवर्गीयांना घटनात्मक संरक्षण मिळाले नाही, तर ते घटना समितीवर बहिष्कार टाकतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशभक्त होते. त्यांनी वेगळे राज्य मागितले नाही, असे ते संविधान दिनाच्या निमित्त रेल्वे स्टेशन परळीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत...