महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सवामध्ये अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथील 2 विद्यार्थ्यांची निवड
आष्टी प्रतिनिधी
24 वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सव-2022 चा आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे दि. 03/12/2022 ते 07/12/2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. या क्रिडा स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संघाच्या खो-खो क्रिडा संघामध्ये अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथील कु. सुशांत जगदीश झाडपिडे आणि कु. आशय दादासाहेब ढोले या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना डॉ. खेमगर बी. बी. आणि प्रा. कनसटवाड ए. एस. यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रिडा महोत्सवामध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भीमरावजी धोंडे,संचालक डॉ.अजय (दादा) धोंडे,प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत, प्राचार्य साईनाथ मोहळकर, प्रा.पवार एम. पी.,प्रा. कनसटवाड ए.एस., प्रा.चित्ते ए.एस., डॉ. मुसळे एस. व्ही., प्रा. अडसरे ए. डी.,प्रा. माहुरे एस. एस., प्रा.सरवदे एस.के.यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment