घरात घुसून मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातुन आष्टी / बारामती येथील आरोपीची निर्दोष मुक्तता



 बीड प्रतिनिधी:- प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की , वाकी ता . आष्टी जि.बीड येथील संभाजी खवळे दिपीका खवळे व शारदा खवळे हे बारामती येथील गणेश रंदावणे यांच्या विटभट्टीवर मजुर म्हणुन काम करण्यासाठी होते . त्यांनी पंधरा दिवस विटभट्टीवर काम केले व ते वाकी ता.आष्टी जि.बीड येथे निघुन आले परंतु उचल घेतलेली रक्कम रु . 65,000 / - रुपये परत न करता व ते काम न करता तेथुन परत आले होते . त्यांच्याकडील उचलीचे पैसे मागण्यासाठी दिनांक 21/01/2019 रोजी रमेश हरिचंद्र चौरे रा . डोंगरगण ता . आष्टी जि.बीड व गणेश अविनाश रंदावणे रा . बारामती जि.पुणे यांनी शारदा देविदास खवळे रा . वाकी यांच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून शारदा देवीदास खवळे व घरातील इतर लोकांना मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप आरोपीवर होता . सदरील फिर्यादीवरुन पो.स्टे . आष्टी येथे गु.र.नं. 25/2019 हा गुन्हा नोंद झाला व यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे , मंदार नाईक , भास्कर सावंत यांनी या प्रकरणात तपास केला व मा . विशेष जिल्हा व सत्र न्यायालय , बीड येथे स्पेशल अॅट्रॉसिटी केस नं . 11/2019 दोषारोपत्र हे मा . न्यायालयात आरोपी विरोधात दाखल झाले . सदरील प्रकरणात अकरा साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले परंतु सबळ पुराव्या अभावी आरोपी रमेश चौरे व गणेश रंदावणे यांची तिसरे मा . विशेष जिल्हा व सत्र न्यायालय , बीड यांनी दिनांक 25 / 11 / 2022 रोजी कलम 452,324,323,504,34 भा.द.वी. व कलम 3 ( 1 ) ( r ) ( s ) अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा अधिनीयम 2015 या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली . आरोपी तर्फे अॅड . अविनाश प . गंडले यांनी काम पाहिले त्यांना या कामी अॅड . इम्रान पटेल , अॅड . बप्पा माने , अॅड . सुरक्षा जावळे , ॲड . गोवर्धन पायाळ , अॅड . किरण मस्के , अॅड . आर . पी . बनसोडे , अॅड . शुभम सरवदे , अॅड . राजेश शिंदे यांनी साह्य केले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी