चऱ्हाटा येथे भारतीय संविधान दिन साजरा
बीड प्रतिनिधी.:-बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे धम्मदीप बुद्ध विहारात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच हनुमान ससाणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष शाहू आप्पा डोळस हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच हनुमान ससाणे आणि शाहू डोळस यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुढे बोलताना वक्त्यांनी संविधान निर्माण आणि उद्देश यावर प्रकाश टाकला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुदाम ससाणे, चंद्रभागा ससाणे, ग्रा. पं. सदस्य खंडू खंडागळे, माजी सदस्य लहू ससाणे, विजय साबळे, भागवत साबळे, लहू खंडागळे, पप्पू इंगोले, अंगणवाडी ताई कुसुम ससाणे, नंदुबाई दैठणकर यांच्यासह महिला आणि लहानथोर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गावातील भिमसैनिक मुकेश ससाणे यांनी केले होते.
Comments
Post a Comment