जैन धर्मशाळा नांदगाव येथे दिगंबर जैन संत आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांचे मधुर प्रवचन मालिके प्रसंगी आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थिती लावली.
आमदार साहेबांनी याप्रसंगी पुलक सागर जी महाराजांचे दर्शन घेत भगवान महावीरांची प्रतिमा भेट दिली तसेच महाराजांनी आमदार साहेबांना पुस्तिका भेट दिली.
याप्रसंगी बोलताना आपला देश जर प्रगती करत असेल तर आपल्यासारख्या धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तींमुळेच हे शक्य आहे असे आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी मत व्यक्त केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याप्रसंगी पुलकसागरजी महाराज यांनी नांदगाव शहरात येऊन धर्माची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल स्वागत करत आभारही मानले. नांदगाव शहरात अहिंसा चौकाची निर्मिती करण्याचे उद्देश फक्त त्या स्तंभाकडे पाहून योग्य दिशा, योग्य आचार व योग्य विचार करण्याची प्रेरणा मिळावी हाच उद्देश्य असल्याचा यावेळेस आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी नांदगाव शहरातील जैन धर्मीय बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment