पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मुलांना मनस्ताप, वारंवार साईट होतेय हँग, - अजय काकडे

बीड प्रतिनिधी:-नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. 
बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली आणि आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागतेय.
बीडपासून 15 किलोमीटर असलेल्या जरुड गावामधील विद्यार्थी विजय अरुण काकडे हा रात्रीच्या वेळी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आला होता. मात्र दिवस उजाडला तरी त्याचा अर्ज सबमिटच झाला नाही. सातत्याने साईट बंद चालू होत असल्याने विजय सारख्या विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमध्ये बसून रात्र जागून काढावी लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना या डचनीचा सामना करावा लागतोय

साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशनही झाले नाही. तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी करत आहेत.
नऊ नोव्हेंबर पासून पोलीस भरती करणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असून आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवसांचा अवधी बाकी आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या या साईटमध्ये जर बदल नाही झाला तर अनेक विद्यार्थी आपला अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थी वर्ग तसेच अजय काकडे यांनी केली आहे



.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी