आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन व आप वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपरी येथे संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधान प्रस्तावना सार्वजनिक वाचून संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस. 26 नोव्हेंबर 2022 हा पक्षाचा 10 वा वर्धापन दिन या निमित्ताने पिंपरी चौक येथे आम आदमी पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली .
सायंकाळी ६ वाजता निगडी येथे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजयजी कुंभार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठा विजय संपादन करण असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर युवराज मठपती, श्रीकांत कदम, रोनाल्ड फिलिप्स, रेखा डोनगाव, यांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी आम आदमी पार्टीचे नेते डॉक्टर अनिल रॉय, आप शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर अमर डोंगरे, के.टी बारापात्रे, सुरेश बावनकर, किशन चावरिया, चंद्रमणी जावळे मामा, भिम मांगडे, सिताताई केंद्रे, प्रमोद लाड, महेंद्र कुमार गायकवाड , दत्तात्रेय काळजे, सर्वेश देशमुख, सोनाली झोळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment