भारतीय संविधान जगात श्रेष्ठ -भाई गौतम आगळे सर



परळी (प्रतिनिधी) जगातील सर्व संविधाना पेक्षा भारतीय संविधान जगात श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी केले.‌ लोकशाही देशांमध्ये राज्यकारभार करण्यासाठी राज्यघटना असते. त्यामध्ये कायदेमंडळ, मंत्रिमंडळ , न्यायव्यवस्था व प्रशासन कसे असावे? तसेच राज्याचा उद्देश काय असावा? हे सांगितलेले असते. जवाहरलाल नेहरूंनी ऑस्ट्रेलियाचे विद्वान घटना तज्ञ जेनिंग यांना भारताची घटना लिहिण्यासाठी ठरविले होते. तेव्हा जिनिंगने असे म्हटले होते की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या कायदे पंडित भारतात असल्याने त्यांना संविधान लिहिण्यासाठी बोलवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितले होते की, संविधानामध्ये जर मागासवर्गीयांना घटनात्मक संरक्षण मिळाले नाही, तर ते घटना समितीवर बहिष्कार टाकतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशभक्त होते. त्यांनी वेगळे राज्य मागितले नाही, असे ते संविधान दिनाच्या निमित्त रेल्वे स्टेशन परळीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 
     पुढे ते म्हणाले की भारताची राज्यघटना लोकशाही व संसदीय पद्धतीची आहे. ती सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य अशी आहे.भारतात राजेशाही होती. ती नष्ट केली असून,लोकांचे राज्य आहे. पूर्वी भारतात वेद, मनुस्मृतीवर आधारित वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आधारित शासन व समाज व्यवस्था चार हजार वर्षांपासून होती. भारतात १२०० वर्ष बौद्ध राज्यांचे राज्य होते.भारतात मुस्लिम शासन ७०० वर्षे होते. त्यानंतर इंग्रजी शासन इसवी सन १९५७ पासून सुरू झाले.इसवी सन १७९३ ला "वॉरन हेस्टिंग" ने रेग्युलेटिंग ऍक्ट केला. त्यानंतर त्यांनी अनेक कायदे केले. पुढे इसवी सन १८८५ ला काँग्रेस स्थापन झाली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक स्वातंत्र्याच्या लढा सुरू केला. तसेच न्यायमूर्ती रानडे, आगरकर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी राजकीय आंदोलन केले. 

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व प्रकारच्या शोषण व विषमतेविरुद्ध प्रचंड लढा दिला, व देशाची राज्यघटना लिहून दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी देशाला अर्पण केली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे मुख्य निर्माते आहेत. सर्व भारतीयांनी बंधुभावाने राहणे ही काळाची गरज आहे संविधानाचा सन्मान व प्रचार होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.आज संपूर्ण देश जातीयवादी धर्मवादी व हिटलरशाही चालवून देशाची अखंडता व संविधान मोडकळीस काढण्याचा प्रकार सध्या देशातील मनूवादी सरकार करत आहे असे दिसून येत आहे. संविधान प्रेमी जनतेने संविधान वाचवण्याची मोठी जबाबदारी आज येऊ पाहत आहे. तेव्हा सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडू या असे आवाहन शेवटी आगळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती अग्रबत्ती व पुष्पहार अर्पण आगळे सरा सहीत इतर प्रमुख पाहुन्यांनी करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.‌ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.आय. ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोडे, प्रा. दासू वाघमारे, उपस्थित होते. तर कार्यामाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जे.के. कांबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडी जिल्हा सह सचिव अॅड. संजय रोडे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सेवा निवृत्त कर्मचारी एस.एस. सोणवणे, अशोक वाघमारे, शिवाजी बनसोडे सर, प्रजावतीताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाष वाघमारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजित रोडे, समता सैनिक दलाचे यशपाल बचाटे यांच्या सह संविधान प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी चे भालचंद्र ताटे यांनी केले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यक्रमाचे संयोजक अॅड. संजय रोडे यांनी दिली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी