अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता


बीड प्रतिनिधी :- अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पुणे (आळंदी)येथे पळून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीस माननीय सत्र न्यायालय बीड यांनी सबळ पुराव्या अभावी आज निर्दोष मुक्त केले . याबाबत सविस्तर माहिती अशी की , अल्पवयीन मुलीने दिनांक 10 / 04/2018 रोजी फिर्याद दिली की ,दिनांक 05/06/2016 रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या नावावर ट्रॅक्टर व अर्धी शेती करतो असे म्हणून चुंबळी येथे नेले व तेथे जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले . त्यांनतर आरोपीने आळंदी येथे भाग्यश्री मंगल कार्यालय आळंदी येथे नेऊन दिनांक 29 / 06 /2016 रोजी एकमेकांना माळा घालून लग्न केले होते . त्यावेळी आरोपीचा भाऊ व बहिण उपस्थित होते अल्पवयीन मुलीचे आईनी दि.16/06/2016 रोजी मुलगी बेपत्ता झालेबाबत पोलीस स्टेशन चंकलबा येथे तक्रार दाखल केली . त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीस 02/07/2016 रोजी पोलीस स्टेशनला आणून सोडले व तेथे आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तसेच आई-वडिलांनीही तिला घरी नेण्यात नकार दिला त्यानंतर अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती मार्फत अंबाजोगाई येथे निरिक्षण गृहात सोडले होते . व सध्या माझ्या साठी आई वडीलांना त्रास देत आहे अशी फिर्याद आरोपीच्या विरोधात दिल्यावरून आरोपीचे विरोधात चकलांबा पोलिसांनी भा .द.वी . कलम 363 ,366 ,376 , 506 .व पोक्सो कलम 4 , 12 प्रमाणे गु . र . क्र.54 /2018 प्रमाणे गुन्हा नोंदवला . पोलिसांनी आरोपी अटक करून त्याच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोप पत्र दाखल केले .सदर प्रकरण न्यायदानासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ बीड यांच्यासमोर चालले सदर प्रकरणात एकूण फिर्यादी पक्षाने आरोपीचे विरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सहा साक्षीदार तपासले परंतु फिर्यादी पक्षाच्या कोणत्याही साक्षीदारांची साक्ष आरोपीच्या विरोधात गुन्हा सिद्ध करू शकले नाहीत. व आरोपीचे वकील अँड राम पा.डोंगरे यांनी घेतलेला बचाव आणि केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस मा .जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील मॅडम यांनी दिनांक 26 / 11 /2016 रोजी निर्दोष मुक्त केले सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अँड राम पांडुरंग डोंगरे यांनी काम पाहिले त्यांना अँड.भागवत यादव व अँड.प्रवीण सानप अँड.गणेश कारंडे यांनी सहकार्य केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी