प्राथमिक आश्रम शाळा नाळवंडी येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
प्रज्ञासूर्य मित्र मंडळ[रमाई नगर] यांच्या वतीने आज प्राथमिक आश्रम शाळा नाळवंडी येथे विद्यार्थ्यांना २५० पेन वाटून संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा केला या वेळी संविधानाविषयी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन वाटप करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला,आणि सर्व गुरुजन वर्गाना,आणि विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या....या यावेळी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे, आणि प्रज्ञासूर्य मित्र मंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते....
Comments
Post a Comment