कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी अंकुश गरड यांच्या कुटुंबाचे ॲड.माधव जाधव यांनी केले सांत्वन
परळी प्रतिनिधी : तालुक्यातील कौठळी येथील अंकुश गरड या तरुण शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली असून त्या कुटुंबाची ज्येष्ठ विधीज्ञ तथा समाजसेवक ॲड. माधव जाधव यांनी भेट घेऊन गरड कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी माधव जाधव यांनी दिले. परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचं सत्र चालूच असून कौठळी येथे अंकुश गरड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत व काही अडचण असेल तर बोलून दाखवली पाहिजे ज्यातून मार्ग काढता येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असे आव्हान याप्रसंगी ॲड माधव जाधव यांनी केले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवाकराम जाधव सर, तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष भागवत जाधव, मराठा सेवा संघाचे गंगाराम अण्णा जाधव, मंचकराव गरड, गोपाळ शिंगाडे, उत्तम गरड ,बळीराम गरड, सर्जेराव गरड यांच्यासह उपस्थित गावकरी उपस्थित होते.
.
Comments
Post a Comment