औरंगाबाद येथे आयोजित कृत्रिम हात पाय बसवि त्याचे मोफत शिबिराचे उद्घघाटन कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न
औरंगाबाद येथे आयोजित कृत्रिम हात पाय बसवि त्याचे मोफत शिबिराचे उद्घघाटन कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले , शिबिरात उपस्थित दिव्यांगाना ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कृत्रिम हात पाय वितरण करण्यात आले, नोंदणी झालेल्या जवळपास 176 दिव्यागाना या शिबिरात लाभ देण्यात आला
सोयगाव ( प्रतिनिधी ,.यासीन बेग )
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा ( बाबूजी ) यांच्या जन्मशताब्दी निमित्त साधू वासवाणी मिशन पुणे आणि लोकमत समूहाच्या संयुक्त विद्यमाने लोकमत भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, साधू वासवाणी मिशनचे महाप्रबंधक सुंदरजी वासवाणी, दैनिक लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, सिल्लोड न.प.तील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेता नंदकिशोर सहारे , नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सिटी डेकोरेटर्सचे संचालक मनोज बोरा, कृत्रिम हात - पाय तज्ञ डॉ. सुनील जैन, लोकमत समाचार चे संपादक अमिताभ श्रीवास्तव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी मार्गदर्शन करीत स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमतने कायम जनसामान्यांना न्याय देत अन्यायाला वाचा फोडली. सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमात लोकमत परिवाराचा मोलाचा वाटा राहिलेला असल्याचे ना.अब्दुल सत्तार म्हणाले. लोकमत समूहाच्या माध्यमातून आज दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात - पाय देण्यात आले. हे शिबिर प्रेरणादायी असून या शिबिरातून आत्मिक समाधान मिळाल्याची भावना कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment