पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण; सर्वर हँग: रात्र- रात्र जागून भरावा लागत फॉम
सोयगाव/ प्रतिनिधि मुस्ताक शाह
: तालुक्यासह देव्हारी सावळदबारा , नांदा तांडा, येथील महा ई- सेवा केंद्रावर राज्य सरकारच्या पोलीस भरती प्रकियेत ऑनलाईन अर्ज करण्याची केवळ ३ दिवस उरले मात्र संबधित कंपनीचा सर्वर सतत हँग होत असल्याने रात्र -रात्र बसवून उमेदवारांना अर्ज भरावा लागत आहे. त्यांमुळे भावी पोलिसांना आतापासूनच नाईट ड्युटी लावण्याची चित्र दिसून येत आहे.
या हँग ओव्हरमुळे दहा दिवस अर्ज मदत वाढवावी अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारने पोलिस शिपाई १४ हजार ९५६ जागा पोलिस चालक २१७४ जागा व सशस्व राज्य राखीव दल १२०१ जागा या तीन विभागामध्ये भरती प्रकिया सुरू केली आहे.
सुरूवातीला ३ ते ३० अशी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतू वयोमर्यादेतील बदल करण्याचा ऐनवेळी साक्षात्कार झाल्याने अनेकांनी पोलिस भरती होण्याचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांतच सेवा केंद्रावर मोठी अडचण निर्माण होत असून विद्यार्थी रात्री आठ वाजेपासून मोठी गर्दी होत असून सर्वर हँग पडत असल्याने विद्यार्थ्यांना रात्र - रात्र जागून पहाट काढावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांमुळे शासनाने पोलिस भरतीचे अर्ज भरण्याची मुदत वाढ करावी अशी मागणी विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.
नॉनक्रिमेलचा अर्ज मागवण्यासाठी पंधरा - वीस दिवस गेले, मात्र आता गर्दी होत असून आता रात्री फॉम भरावा लागत आहे. शुल्क भरत असताना सर्वर अधिक त्रास देत आहे त्यांमुळे मला दोन वेळा प्रयत्न करावा लागला दोन वेळा शुल्क भरावा लागला.
- विश्वास राठोड पोलिस भरती उमेदवार
सकाळी आठपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यासोबत बसून उमेदवाराचे फॉम भरत आहे. उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यांमुळे १० डिसेंबर मुदत वाढवून दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा मुलांवर अन्याय होणार नाही. - राहुल राठोड केंद्रचालक सोयगाव
Comments
Post a Comment