भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा - स्वराज्य संघटनेची मागणी.
गेवराई/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झालेपासून महाराष्ट्र राज्य, महापुरूष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता यांबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत.
आपल्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळ केलेला आहे.
यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे.
महोदय, आम्ही आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदया व माननीय पंतप्रधान महोदय यांना कळवू इच्छितो की, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो.सदर निवेदनाची दखल घ्यावी व भगतसिह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अन्यथा महाराष्ट्रात जनआंदोलणाच्या माध्यमातून जे काही परिणाम होतील यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आपण आपले शासन प्रशासन असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन स्वराज्य संघटनेच्या वतीने गेवराई तहसील कार्यालयात देण्यात आले.या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे बीड जिल्हा निमंत्रक तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक, मुक्तराम मोटे,सुदाम मोरे,महेश पवार,अनिकेत नाटकर,अभिषेक जामकर,अमोल मोटे,अलीम सय्यद,सोमनाथ डोळस,गोकुळ जंगले,अभिषेक नाटकर,सचिन मोटे,सूरज घोडके, लक्ष्मण मोटे,जयराम काळे,दत्ता गिरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment