शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा:-कॉ.महादेव नागरगोजे
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने चुंबळी येथील विध्यार्थींच्या शिक्षणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत असल्याने कॉम्रेड महादेव नागरगोजे व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत याकडे लक्ष वेधले आहे.
शासनाच्या वतीने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावखेड्यात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे १ ते ७ वी प्रर्यंत शाळा असुन तेथील विद्यार्थ्यांची ९६ पटसंख्या असुन तेथे ७ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक्षात तेथे २ दोनच शिक्षक उपलब्ध असतात व बाकीचे शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. त्यामध्ये काही शिक्षक दारू पिऊन उपद्रव माजवित असल्याचेही प्रकार घडत असुन याबाबतीत पालकांच्या वतीने विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून याकडे गटशिक्षणाधिकारी यांनी लक्ष देऊन सतत दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी नसता आपल्या कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर कॉ.महादेव नागरगोजे,सरपंच हरिचंद्र सोनवणे,बाबुराव पवळ,नरहरी पवळ,मोहन सोनवणे,सागर गोदंकर,सतिष केदार, संगिता रामराव केदार आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Comments
Post a Comment