मालेगावी पुरोगामी साथीनी केला संविधान जागर
मालेगाव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान स्वीकृती दिन निमित्ताने मालेगावमधील राष्ट्र सेवा दलासह विविध संघटनांच्यावतीने संविधान फेरी काढून संविधान जागर करण्यात आला. महात्मा गांधी यांचे पुतळा, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करीत संविधान चौक, किडवाई रोड येथील अशोक स्तंभास अभिवादन करून फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी सर्वानी संविधान प्रास्ताविका म्हटली. गीता बायबल हो या कुराण सबसे बडा संविधान, लोकशाही जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर संगमेश्वर येथील सत्यशोधक मैदान सर्व कार्यकर्त्या सोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मालेगावचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी संवाद साधला. सर्व कार्यकर्त्याना नचिकेत कोळपकर यांचे तर्फे संत तुकारामाच्या अभंगाचे पुस्तक ताऊ परदेशी यांचे हस्ते भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, जेष्ठ सेवा दल सैनिक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, मोरेश्वर जोशी, सिद्धार्थ मगरे, अतुल मोरे, विशाल पवार, संतोष पवार, नसीम अहमद, मयुर वांद्रे, सलीम शेख, सतीश शेवाळे, अनिल देवरे, यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment