पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी पद भरती सरस बोगसगिरी
बोगस तात्काळ थांबवा हरिदास शेलार.भगिरथ बांड,अशोक थोरात, अमोल पारवे योगेंद्र पारवेकर यांची मागणी
बीड / प्रतिनिधी
आपण सिनर्जिज सोल्युशन प्रा. लि. कंपनी अंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पशुधन पर्यवेक्षक(L.S.S.) या पदाची जी कंत्राटी पध्दतीने दिनांक 11/11/2021 पासून ते दि 24/09/2022 पर्यंतची केलेली निवड ही अयोग्य मार्गाने केली आहे. ती तात्काळ थांबवावी.1) पशुधन पर्यवेक्षक(L.S.S.) हा डिप्लोमा सन 2007 मध्ये शासनाने बंद केलेला आहे. (यांचे विषय 1) औषधीशास्त्र, व शल्य चिकित्सा 2) विकृती व सुक्ष्म जीवशास्त्र 3) भीषकशास्त्र 4) पशुप्रजनन असे विषय होते.2) सन 2007 च्या नंतर LMDP हा डिप्लोमा शासनाने दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करण्यासाठी चालू करण्यात आला आहे. पशुधन पर्यवेक्षकाL S.S.) यासाठी नाही. (1) गायम्हैस पालन व दुध उत्पादन 2) दुधाचे गुण नियंत्रण 3) दुधाची स्त्री व विक्री 4) दुधजन्य पदार्थ निर्माती व तंत्रज्ञान 5) शेळी, मेंढी व वराह पालन 6) कुक्कटपालन 7) कृत्रिम रेतन.3) शासकीय पशुधन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना व संबंधित मर्जीतील व्यक्तींना त्यांचा पशुधन पर्यवेक्षकाLS.S.) हा डिप्लोमा धारक नसून LMDP हा दूध व्यवसाय हा व्यवसाय करण्यासाठी डिप्लोमा असून सुध्दा पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्त पदावर चुकीच्या मार्गाने निवड करुन दिली आहे.4) जि.प. पशुसंवर्धन अधिकारी व सिनर्जिज सोल्युशन प्रा. लि. कंपनी यांच्या संगणमताने या सर्व उमेद्वाराकडून आर्थिक व्यवहार करून व त्यांच्या अपुऱ्या नावाची यादी कंपनीने देवून चुकीच्या पध्दतीने नियुक्ती करण्यात आली आहे. जेवढे LMDP डिप्लोमा धारक हे आपण पशुधन पर्यवेक्षक या पदावर घेतलेले ५)आहेत. त्यातील एका ही डिप्लोमा धारकाकडे अनुभव (प्रशिक्षण) प्रमाण पत्र नसून सुध्दा आपण यांची चुकीच्या मार्गाने निवड केली आहे.6) सध्या पशुमध्ये भयंकर लग्यो किनची सुरुवात पशुमध्ये झपाटयाने वाढत असल्यामुळ आम्हा प्रायव्हेट LSS डिप्लोमा धारक हे ज्यांच्या त्यांच्या तालुका जिल्हयातील शासकीय पशुसंवर्धन दवाखान्यात उपलब्ध असलेली Goat Pox Vaccin घेऊन दि. 14/09/2022 रोजी पासून गावा- गावात वाडया, वस्त्या, तबेले व गावा बाहेरिल शेतात राहत असलेल्या गाय गोठयापर्यंत जाऊन लंम्पी स्किनची लस ही कोणत्याही पशुपालकाकडून एक ही रुपया न घेता (फ्री) मोफत सेवेत केली आहे.7) आम्ही प्रायवेट LSS डिम्लोमा धारक हे जि. प. स्तरीय व राज्यस्तरीय पशुसंवर्धन दवाखान्यांना 15/16 वर्षापासून, कृत्रीम रेतन, लसीकरण / टॅगिंग व नर पशुचे खच्चीकरण पशुगणना इत्यादी कामास सहकार्य करीत आहोत.मा.साहेबांना जि.प. स्तरीय व राज्यस्तरीय पशुसंवर्धन अधिकारी यांनी सरळ सेवा भरती असो किंवा कंत्राटी पध्दतीने भरती असो या भरतीत पशुंची सेवा करण्यासाठी फक्त LSS पशुधन पर्यवेक्षक याच डिप्लोमा धारकांना संधी देण्यात यावी अन्यथा आम्हास आंदोलन व उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागेल याची सर्व जिम्मेदारी ही सिनर्जिज सोल्युशन प्रा. लि. कंपनीची राहील याची नोंद घ्यावी असे लेखी स्वरूपात निवेदन मा जिल्हाधिकारी साहेब बीड. मा.मुख्यकारकारी अधिकारी जि.प. बीड. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बीड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बीड यांना देण्यात आले या वेळी पशुसंवर्धन संघटनेचे जिल्हा सचिव डॉ.हरिदास शेलार पशुधन पर्यवेक्षक असोसिएशन चे संपादक डॉ. योगेंद्र पारवेकर.गेवराई तालुका अध्यक्ष डॉ.प्रभाकर निकाळजे बीड तालुका अध्यक्ष. डॉ.भगिरथ बांड डॉ अमोल पारवे यांच्या सहृया आहेत.
Comments
Post a Comment