स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्यायावर आधारीत भारतीय संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे-प्रा.वसंतराव ओगले

स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्यायावर आधारीत भारतीय संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे-प्रा.वसंतराव ओगले

महामानव अभिवादनतर्फे शालेय साहित्य वाटप 
 बीड (प्रतिनिधी):- भारतीय संविधान जगातील श्रेष्ठ संविधानापैकी सर्वश्रेष्ठ संविधान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारीत संविधानाचे अनुपालन करणे मानव हिताचे आहे असे प्रतिपादन प्रा.वसंतराव ओगले यांनी केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्या दिनाचे औचित्य साधून महामानव अभिवादन ग्रुप व ‘वाचाल तर वाचाल’ फिरते मोफत वाचनालयातर्फे शालेय साहित्य व पुस्तकाचा संच वितरण कार्यक्रम आनंद छात्रालय पांगरी रोड बीड येथे केला होता. या प्रसंगी आनंद मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड.व्ही.बी.मगर लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील विचारवंत प्रा.वसंतराव ओगले, से.नि.असिस्टंट जनरल मॅनेजर बीएसएनएलचे भिमराव कांबळे, संस्थेचे अध्यक्ष बी.ए.धुताडमल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर महामानव अभिवादन ग्रुपचे कॅप्टन राजाभाऊ आठवले, डी.जी.वानखेडे, बी.डी.तांगडे, मुख्याध्यापक बी.ए.हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एम.भोले यांनी करुन महामानव अभिवादन ग्रुप राबवित असलेल्या उपक्रमाची व पुढील नियोजित उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्वप्रथम महामानवांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महामानव अभिवादन ग्रुप तर्फे महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या दानातून प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 रजिस्टर व 2 पेन असे एकुण 17 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तर उपा.भिमराव कांबळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांस कंपास भेट दिला. मान्यवरांच्या हस्ते ‘वाचाल तर वाचालच्या फिरते मोफत वाचनालयाच्या 37 व्या केंद्राचे उद्घाटन करुन 50 पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांना वितरीत करण्याकरीता डी.व्ही.खरसाडे यांना सुपूर्द करण्यात आला. संचातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचाल तर वाचाल तर्फे करण्यात आले. 
 विद्यार्थ्यांना संबोधित करतांना प्रा.ओगले पुढे म्हणाले की, बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी बाबांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती तर भिमरावांनी गरीबीमुळे निर्माण होणारा न्युनगंड दूर करुन स्वाभिमानाने जगून अतिउच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरीबीचा न्युनगंड दूर करा, उच्च शिक्षणाची कास धरा, प्रगतीची दारे आपोआप उघडतील असे अनेक उदाहरणे देवून स्पष्ट केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे भिमराव कांबळे, विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना म्हणाले की, सुजान नागरीक बणून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून मागे पडलेल्यांना पुढे जाण्याकरीता मदत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव ठेवावी असे नम्र आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात अ‍ॅड.मगर यांनी सामाजिक ऋण फेडण्याचे कार्य करीत असलेल्या कार्यक्रमाकरीता सर्वांनीच सढळ हाताने दान देवून आपले कर्तव्य निभावले पाहिजे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपा.डी.एम.राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक गायकवाड यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकाचे वाचन प्रा.ए.बी.जवंजाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डी.व्ही.खरसाडे व सुभाष गायकवाड यांनी बहुमोल परिश्रम घेतले. सरणात्तयने कार्यक्रमाची सांगता झाली. 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी