माजी आमदार श्री अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नाने गेवराई तालुक्यात तीन ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्रांना मिळाली मंजुरी

बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे गेवराई तालुक्यातील कोळगाव बोरगाव आणि गढी या ठिकाणी 33 के व्ही उपकेंद्र झाले मंजूर या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होणे वारंवार वीज खंडित होणे अशा तक्रारी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे या तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यावेळी ग्रामस्थांना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिलेल्या आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता झाली आहे लवकरच संबंधित ग्रामपंचायत चर्चा करून महावितरण कंपनीला जागा उपलब्ध करून कामाला वेगाने सुरुवात करण्यात येणार आहे यापूर्वी कोळगाव येथे मंजूर झालेले ३३ केव्ही उपकेंद्र केवळ जागा ग्रामपंचायत उपलब्ध करून न दिल्याने हे उपकेंद्र होऊ शकले नाही आता ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून उपकेंद्राचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे या भागातील ग्रामस्थांनी श्री अमरसिंह पंडित साहेब यांचे विशेष आभार मानले आहे कारण या 33 के व्ही उपकेंद्रामुळे या भागातील गावांना सतत वीज पुरवठा सुरळीत हो ण्यास न्यास मदत होईल असे गढी. बोरगाव व कोळगाव येथील शेतकरी ग्रामस्थ यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे विशेष आभार मानले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी