वंचित बहुजन आघाडी,मालेगांव तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने हरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन

वंचित बहुजन आघाडी,मालेगांव तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने हरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन 
 

   अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव येथील ३ बौद्ध तरुणांना कबुतर व शेळी चोरल्याचा संशयावरून गांवातील स्वतःला उच्च जातीय समजणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या धनदांडग्यांनी बेदम मारहाण करुन अमानुष प्रकारे त्यांना उलटे लटकवून त्यांच्यावर लघवी केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करण्यात आली.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळाने नायाब तहसीलदार यांना निवेदन देत,कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत,युवा जिल्हाध्यक्ष किरण मगरे,सचिव राजू धिवरे,सदस्य राजेंद्र पवार,शहराध्यक्ष कैलास लोहार,तालुका पदाधिकारी सुनील आहिरे,शशिकांत पवार, सिध्दार्थ उशिरे,विशाल जाधव,संदीप महिरे,विशाल आहीरे,सचिन आहिरे,आसिफ शेख,विजय बिऱ्हाडे,महेंद्र आहिरे,मो.यासीन,शफीक अह.विनोद जगताप,दीपक उशीरे,सागर पगारे,दिलीप सोनवणे,सागर म्हसदे,सुरेश आहिरे,प्रवीण उशिरे,संजय हिरे,कादिर शेख,आलिम शेख,अर्शदभाई,सलीम शेख,शेख रमजान,सागर निकम,यश आहिरे,सुशांत साळवे,समाधान आहिरे,कुणाल म्हसदे,संतोष बोराळे,भूषण वाघ,खलील हुसेन,आरिफ खान,पंकज महाले,मुकेश खैरनार,विशाल गांगुर्डे,तुषार पवार,प्रवीण गरुड,अक्षय म्हसदे,अमोल निकम,संदीप पवार,अनिल निकम यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी