नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने कवी प्रा.सागर जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
वामनदादाच्या चळवळीतील शिलेदार महादेव सातोबा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार
बीड(प्रतिनिधी):- नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त बीड शहरामध्ये २७ ऑगस्ट रोजी "भीम वाणी, वामन गाणी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कवी प्रा. डॉ.सागर जाधव यांना नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांच्या हस्ते रोख रक्कम २५ हजार रुपये, स्मृति चिन्ह, माणपत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच वामनदादा कर्डक यांच्या चळवळीतील शिलेदार महादेव सतोबा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संदीप उपरे ( राज्याध्यक्ष,सत्यशोधक ओबीसी परिषदेच,महाराष्ट्र राज्य), सुधाकर बनाटे (माजी शिक्षण उपसंचालक), वामनदादा कर्डक यांचे अंगरक्षक डी.पी.वानखडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अशोक वामनराव धुलधुले, प्राचार्य डॉ. केशव जोंधळे, प्रा. दिपक जमधाडे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मानपत्राचे वाचन प्रो.डॉ.मनोहर सिरसाट यांनी केले.
नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल दरवर्षी महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचे मानकरी प्रा.डॉ.सागर शेवंतराव जाधव यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सत्कार नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने करण्यात आला.
प्रा.डॉ.सागर जाधव यांनी फुले- शाहू- आंबेडकर विचारांची पेरणी करत आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांची विचारधारा पोचवण्याचे काम केले आहे. त्यांनी विविध कविता, चरित्र काव्य, चित्रपट गीत लेखन, काव्यसंग्रह, वगनाट्य, विविध ग्रंथ लिहून महापुरुषांचे विचार मांडले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने गौरवण्यात आले. तसेच वामनदादा कर्डक यांच्या चळवळीतील शिलेदार माधवराव सातोबा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.राम गायकवाड यांनी मानले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्रा.राम गायकवाड, प्रो.डॉ.मनोहर सिरसाट, प्रा.शरद वंजारे, प्रा.डॉ.संजय कांबळे, प्राचार्य डॉ.पांडुरंग सुतार, आयु.सिद्धार्थ वाघमारे, आयु.अशोक मसलेकर यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment