कोरडा दुष्काळ जाहीर करा, अग्रीम पिकविमा सरसकट द्या, मुख्यमंत्री,कृषीमंत्र्यांना निवेदन
कोरडा दुष्काळ जाहीर करा, अग्रीम पिकविमा सरसकट द्या, मुख्यमंत्री,कृषीमंत्र्यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे
बीड:- कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सोयाबीन, उडीद आणि मुग यांच्या सह ईतर पिकांनाही अग्रीम पिकविमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसह प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत जिल्ह्यातील मंडळांना सरसकट अग्रीम पिकविमा देण्यात यावा. बीड जिल्ह्यातील वगळण्यात आलेली बीड तालुक्यातील म्हाळसजवळा पाली,नाळवंडी आणि शिरूर तालुक्यातील खालापुरी, पाडळी,खोकरमोह, आदि.मंडळांना अग्रीम पिकविम्याचा लाभ देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस, रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषीमंत्री,कृषी आयुक्त यांना दिले असुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सविस्तर माहितीस्तव
कोरडा दुष्काळ जाहीर करुन सरसकट दुष्काळी अनुदान देण्यात यावे.
-----
पावसाळा सुरू होऊन ३ महिन्यांचा कालावधी लोटला असुन ९१ दिवसात केवळ २१ दिवस काही ठिकाणी रीमझिम पाऊस पडला असुन ७० दिवस कोरडे गेले आहेत.यामुळे पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असुन ३१ आगस्ट रोजी आलेल्या प्रकल्पीय अहवालात जिल्ह्यातील १४३ प्रकल्पात केवळ १२.२३ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचा अहवाल आला असून १०० पेक्षा अधिक तलावांनी तळ गाठल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर बनली असुन पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा आणि चा-याचा प्रश्न गंभीर बनला असुन शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे.त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट दुष्काळी अनुदान देण्यात यावे.
बीड जिल्ह्यातील सर्वच मंडळांना अग्रीम पिकविमा मंजुर करावा , वगळलेल्या बीड, शिरूर तालुक्यातील मंडळांना अग्रीम पिकविमा मंजुर करण्यात यावा.
--
जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असुन खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्रच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन पिक विमा कंपनीच्या नियमानुसार २१ दिवसांपेक्षा आधिकचा पावसाचा खंड आणि पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास एकुण संरक्षित विमा रकमेच्या २५ टक्के अग्रीम देण्याच्या तरतुदीनुसार बीड
जिल्ह्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट २५ टक्के अग्रीम पिकविमा देण्यात यावा.
बीड तालुक्यातील पाली,म्हाळसजवळा,नाळवंडी आणि शिरूर तालुक्यातील खालापुरी, पाडळी,खोकरमोहा या मंडळातील खरीप हंगामातील मुग, सोयाबीन, उडीद,कपाशी,तुर करपण्याच्या अवस्थेत असुन वरील वगळण्यात आलेल्या मंडळांचा अग्रीम पिकविमा योजनेत समावेश करण्यात यावा.
सोयाबीन, उडीद ,मुग प्रमाणेच कपाशी,तुर आदि.पिकांसाठी अग्रीम पिकविमा द्या
---
बीड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला असुन पाण्याअभावी पिके करपून चालली आहेत.जिल्ह्यात सोयाबीन पिकाची पेरणी ३ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर तर कपाशीची लागवड २ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली असुन पावसाअभावी दोन्ही पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.प्रधानमत्री पिकविमा योजनेच्या जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी बीड यांनी अधिसूचना काढुन ५२ महसूल मंडळात सोयाबीन, २२ महसूल मंडळात मुग तर १३ महसूल मंडळात उडीद पिकाला २५ टक्के अग्रीम पिकविमा मंजुर करण्याबाबत अधिसूचना काढली आहे.खरीप हंगामातील सर्वच पिकांनी माना टाकल्या असुन केवळ ३ पिकांचाच अग्रीम साठी विचार करण्यात आला असुन कापूस,तुर व ईतर पिकांचा विचार करून २५ टक्के अग्रीम पिकविमा देण्यात यावा.
Comments
Post a Comment