तळेगाव रोही गावकऱ्यांचे दुष्काळ जाहीर करून पिण्याचे पाणी, गुरांना चारा उपलब्ध करून देण्याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
चांदवड :- तालुक्यातील मौजे तळेगाव रोही हे गाव डोंगराळ , दुष्काळग्रस्त समजले जाणारे गाव असून या परिसरामध्ये पावसाळा ऋतू सुरू झाल्यापासून अद्याप पर्यंत प्रमाणात म्हणावा असा पाऊस पडलेला नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामधील विहिरींचे, तलावांचे व तळ्यांमधील पाणी सुद्धा आटले आहे. गुरा - जनावरांना आणि मानवाला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे सैरावैरी आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणीसाठी वणवण - शोधाशोध करावे लागत असल्याने हया पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन शासनाने हया गंभीर प्रश्नांकडे/ समस्यांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ लक्ष घालावे.
हया सर्व परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी खासदार, आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकारीही लक्ष घालत नसल्या कारणास्तव गावकऱ्यांनी आज चांदवड उपविभागीय तथा प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देऊन गावाच्या समस्या हया निवेदनात मांडल्या आहेत. हे निवेदन नायब तहसीलदार जे.जे केदारे यांनी स्वीकारले. जनतेला पिण्याचे पाणी नाही, रोजगार नाही, गुरांना चारा नाही दुष्काळाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी व गुरांना चारा व जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. असे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. हया निवेदनावर गावातील नागरिकांच्या सह्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते धनाजी मोरे, लालु मोरे, कॉ. सुखदेव केदारे , दिवाकर केदारे, बाबाजी पवार , गुलाब जिरे , बाळा जिरे , रविन्द्र गंगाधर केदारे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment