मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
समदीप सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
वडवणी प्रतिनिधी
मुलीच्या जन्माला तुच्छ समजणाऱ्या या समाजामध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. याचाच प्रत्यय पुसरा येथील झोडगे परिवाराचा हा सामाजिक उपक्रम पाहून आला. मुलीचा पहिला वाहिला वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील लहान सहान विद्यार्थ्यांना वही पेन आणि खाऊ वाटप करून साजरा करण्यात  आला. या सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच हरिभाऊ पवार,  भावी पंचायत समिती सदस्य बंडू  नाईकवाडे सदस्य बंडू नाना मुजमुले, पत्रकार अविनाश मुजमुले, पत्रकार सतीश मुजमुले युवा नेते आदर्श दादा मुलमुले,प्रदीप झोडगे, सचिन झोडगे, विशाल झोडगे, विष्णुबाळ झोडगे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते, तसेच  समदीप सामाजिक  प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते..  कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी सिद्धी बाळास वाढदिवसाच्या अनेकत्तर शुभेच्छा दिल्या.
  
  
Comments
Post a Comment