मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या गेवराई शहर बंदची हाक
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :-
दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मागणीसाठी शहागड येथील पैठण फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट जण आक्रोश आंदोलन संपन्न झाले. मात्र यानंतरही सरकारने कुठलाच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील अंतरवली साराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. 01 सप्टेंबर रोजी गेवराई शहर बंद ची हाक देण्यात आली आहे. आज दि.31 रोजी 11 वा.शहरातील बेदरे लॉन्स येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवराई बंद ची हाक देण्यात आली. या आवाहनाला व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे.
Comments
Post a Comment