जिल्हा परिषद वाघाचा वाडा शाळेतील चिमुकल्यांनी निसर्ग शाळेचा मनमुराद घेतला आनंद


पाटोदा (गणेश शेवाळे)शालेय उपक्रमा सोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी जिल्हा परिषद वाघाचा वाडा प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला. 
मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता, प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला.व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या.वाघाचा वाडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ.जयक्षी बडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी निसर्ग शाळेत सहभाग नोंदविला शिक्षिका बडे यांनी शेती करण्याच्या पद्धती व अवजारे यांच्या विषयी माहीती दिली. हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी सह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष मध्यान्ह भोजनावर ताव मारला. सदरील उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद वाघाचा वाडा शाळेतील शिक्षिका सौ.जयक्षी बडे यांनी केले होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी