आष्टी तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवा- शिवसंग्रामचे ज्ञानदेव थोरवे यांची मागणी
दुष्काळात तेरावा महिना !
आष्टी तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवा- शिवसंग्रामचे ज्ञानदेव थोरवे यांची मागणी
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
पावसाच्या सुरुवातीला हवामान खात्याने यंदाच्या पावसावर अलनिनोचा प्रभाव असल्याचे भाकीत करीत दुष्काळी स्थितीचे संकेत दिले होते ,अगदी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली असुन सप्टेंबर महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने व पिकं येणारच नसल्याची खात्री झाल्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कांदा, सूर्यफूल, कपाशी अशी उभी पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी , व लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करुन, दुष्काळी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव थोरवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे .
संपूर्ण पावसाळ्यात जून / जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा विना पावसाचा निघून जाण्याच्या मार्गावर असून ऑगस्ट महिना ही संपायला ,तरी तालुक्यात चांगला व अपेक्षित पाऊसच झाला नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत .सतत पडणाऱ्या अस्मानी सुलतानी संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्यांनी शेती मशागत करून खरीप पिकांची लागवड केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकर्यांनी कापूस, मूग, उडीद, मका, सोयाबीन, तुर , बाजरी, कांदा, सूर्यफूल अशा मुख्य पिकांची लागवड केली. महागडी बियाणे , खते वऔषधे ही खरेदी करून शेतीची मेहनतीने मशागत केली. परंतु जून महिन्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने पहिलंदा केलेली खरीप हंगामातील लागवड वाया जाऊन आर्थिक संकटाचा भार पडतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असून जुलै महिन्यात एक दोन वेळा पाऊस वगळता चांगला पाऊस झाला नाही. मात्र पावसाने पुन्हा पाठ फिरवून हुलकावणी दिल्याने शेतकर्यांनी पिकांना जीवदान म्हणून महागडी खते व फवारणी देखील केली. मजूर लावून शेतीची मशागत देखील करून घेतली. सुरुवातीपासून पाऊस कमी असल्याने त्यात मे महिन्यासारखे कडक उन्हाळ्याचे ऊन पडत असल्याने खरीपाचे पिके ही उन्हाने काळवंडली व पिके जळू लागली आहेत. त्या पिकांची खुंटलेली वाढ आता होणार नाही व उत्पन्न अत्यल्प होणार असल्याचे लक्षात घेऊन शेतकर्यांनी लागवड केलेली पिकांची उभे पीक करपून गेल्यामुळे वखरणी करून काढून टाकल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे.
पावसाच्या गेल्या २५ ते ३० दिवसा पासून मोठ्या दडीमुळे खरीप पिकांची मोठी हानी होऊन संपूर्ण हंगामच वाया गेल्याने शेतकर्यांची आर्थिक गोची निर्माण झाली असून परिणामी कुंटुंबाचा गाडा कसा हाकलावा असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला असून शासनाने या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शेतकर्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी ,शाळेची शैक्षणिक फी माफ करावी , शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्ज माफ करुन , जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा ,व कोरडा दुष्काळ जाहीर करून सोबत काढलेल्या पीक विम्याची संपूर्ण नुकसान भरपाई तात्काळ शेतकर्यांना देऊन त्यांच्या ह्या आर्थिक संकटात निःपक्षपातीपणे मदत करावी अशी मागणी शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस प्रा.ज्ञानदेव थोरवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .
Comments
Post a Comment