श्री संत भगवानबाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची सावरगावघाटात जय्यत तयारी
श्री संत भगवानबाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची सावरगावघाटात जय्यत तयारी
ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन; राजकीय नेत्यांची उपस्थिती.. जय जवान ग़ुप
बीड जिल्हा ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या १२७ व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी त्यांचे पावन जन्मस्थळ श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे होत असून जय जवान ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवार ४ सप्टेंबर २०२३ रोजी हा सोहळा संपन्न होत असून, रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन ते तीन यावेळेत ह भ प महंत पांडुरंग महाराज (डोंगरेश्वर संस्थान करंजवण) यांच्या शुभ हस्ते कलश पूजन व प्रवचन होणार आहे. तसेच श्री संत भगवान बाबा यांच्या १२७ जन्म महोत्सवा सुहास सन २०२३ निमित्त आयोजित सन्मान ज्ञान स्पर्धा पहिला गटाच्या चौथी ते सातवी मधून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तसेच दुसरा गट आठ ते बारा गेल्या १२६ व्या जन्मोत्सवापासून ते १२७ वा जन्मोत्सवापर्यंत सावरगाव घाट मधून नोकरीला लागलेल्या चा सन्मानचिन्ह देऊन गौरव वितरण जय जवान ग्रुप च्या वतीने देण्यात येणार आहे श्री संत भगवान बाबा यांच्या १२७ वा जन्म सोळावा सन २०२३ निमित्त आपल्या कार्यक्रमाच्या गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी चार ते सहा वेळात ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन व रात्री नऊ ते अकरा या वेळात सामुदायिक जागर होईल.
दिनांक ४ सप्टेंबर २०२३ सोमवारी सकाळी सहा वाजता घरोघरी गुढ्या उभारल्या जातील व संत भगवान बाबांच्या मूर्तीस जल अभिषेक व बाबांची आरती करण्यात येईल. सकाळी सात- तीस ते दहा- तिस च्या वेळात बाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल. सकाळी ११ ते १ या वेळेत ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद होईल.
दरम्यान, भगवान भक्ती गड येथे होणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यास बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्यासह आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. बाबांच्या या जन्मोत्सव सोहळ्यासाठी व धार्मिक उपक्रमांसाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जय जवान ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment