अमानवी कृत्य करनाऱ्या पाटलावर कडक शासन करा,वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी
.
गेवराई / प्रतिनिधी
अमानवी कृत्य करनाऱ्या युवराज गलांडे पाटलावर कडक शासन करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना तहसिलदार गेवराई यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
हरेगाव (ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) येथील शुभम विजय मघाडे या बौध्द तरुणाला कबुतर व शेळ्या चोरीचा खोटा अरोप करत, त्यास घरातून युवराज गलांडे पाटील यांच्या नोकरांनी उचलुन नेले त्यानंतर विशाल याने मला येथे का आणले अशी विचारणा केली असता त्यास युवराज गलांडे पाटील व ईतर तीन ते चार लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केली, त्यानंतर विशाल यास नग्न करुन झाडाला उलटे टांगून त्यावर लघुशंका केली, युवराज पाटील याने स्वत:च्या बुटावर थुंकुन ती थुंकी विशाल यास चाटायला लावली व केलेल्या कृत्याची कुठे वाच्यता अथवा तक्रार केली तर तुझ्या घराच्यांसह तुला जिवे मारु अशी धमकी दिली.
सदरील प्रकार हा अत्यंत घृणास्पद असून अमानविवय आहे, या कृत्यामुळे विशाल विजय मघाडे याच्या शरीरावर तसेच मनाला गंभीर इजा झाली असल्याने युवराज पाटील व ईतर चार आरोपींवर कठोर शासन करावे तसेच कठोर शासन न केल्यास वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तिव्र स्वरूपाचे अंदोलन करेल आणि यास सर्वस्वी राज्य सरकार व प्रशासन जबाबदार राहिल अशी मागणी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांना तहसीलदार गेवराई यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड,सुदेश पोद्दार,भिमराव चव्हाण, किशोर भोले, दस्तगीर शेख,किशोर चव्हाण, सचिन कांडेकर, बाजीराव बाबर, संदिप तुरुकमारे, ज्ञानेश्वर हवालेसह आनील साळवे, सचिन गायकवाड योगेश दळवी,ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment