महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील जनतेची व सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा कधी थांबणार, परमेश्वर नाना तळेकर
,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
बीड जिल्हा व इतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बाबत, कृष्णा खोऱ्याचे पाणी महाराष्ट्र मध्ये प्रत्येक नदी व तलाव यांना जोडून बीड जिल्हा दुष्काळग्रस्त व ऊसतोड कामगारांचा जिल्हा यातून शाप मुक्त करण्यात यावा, बीड जिल्हा व इतर जिल्ह्यात रेल्वेचे काम पूर्ण होत असताना एमआयडीसीमध्ये औद्योगिकरण वाढून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, महाराष्ट्र हा कापूस पिकावनारा राजा आहे, त्या कापसावरील GST कमी करावी, जशी उसावरील 30 %income इन्कम टॅक्स वाचवले तसे शेतकऱ्यांकडून व्यापाराने घेतलेल्या कापसाला 5%टक्के GST, भरावी लागते तो बोजा शेतकऱ्यांवर पडतो परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाला 400 प्रतिक्विंटल भाव कमी मिळतो, पश्चिम महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे 500रुपये प्रति टन आपण MRP वाढवाली ,तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चारशे रुपये प्रत्येक क्विंटल भाव वाढून मिळेल, मराठा समाजातील सुशिक्षित तरुण नोकरी भरती आपण चालू केली आहे ,परंतु मराठा समाजातील तरुण मुलांना आरक्षण नसल्यामुळे कमी प्रमाणात सरकारी नोकरीमध्ये भरती होतात त्यासाठी ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्या केतुरा गावचे सरपंच तथा शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना ई-मेलद्वारे मागणी केली आहे,
Comments
Post a Comment