पाटोदा तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा - पांडुरंग नागरगोजे
पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन पाटोदा तहसील कार्यालयात देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदाचा खरीप हंगामातील सर्व पिके पाणी नसल्याने पुर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील कोणत्याही गाव तलाव अथवा पाजर तलावामध्ये पाणीसाठा शून्य टक्के असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे अशातच महावितरण कंपनीने लोड शेडींगच्या नावाखाली विद्युत कंपनी लाईट बंद करून शेतकऱ्यांची कुचंबना करत आहे यामुळे शासनाने पाटोदा तालुक्यात पाऊस न पडल्याने शेतकरी राजा हवाल दिल झाला असल्यामुळे पाटोदा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करुन सरसकट शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावा तालुक्यातील सर्वांना स्वस्त धान्य दुकानात मोफत रेशन व गॅस देऊन मजूर ऊसतोड कामगाराना दुष्काळी कामे उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन पाटोदा तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी दिले यावेळी नगरसेवक सुशील कवठेकर,अनिल जायभाय, शाम हुले,सरपंच तात्यासाहेब लाड,संजय कांकरिया,प्रदीप नागरगोजे, थोरात मधुकर,राजपाल शेंडगे,सचिन गाडेकर, चंद्रशेखर साठे, गणेश खाडे,करण तांदळे,रोहित गर्जे,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment