तुलसी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोष आणि उत्साहात साजरा
शरीर तंदुरुस्त रहावे यासाठी आपण भरपूर खेळलेच पाहिजे - प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात
बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.एल.एम थोरात यांनी खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते, म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला तसेच तुलसी महाविद्यालयात क्रीडा संस्कृती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे विद्यार्थ्यांना सांगितले. उपप्राचार्य डी.जी. निकाळजे भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तुलसी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.राहुल सोनवणे यांनी कार्यक्रमा निमित्ताने विविध खेळांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळातील जागतिक कामगिरीची माहिती दिली.आजही आपण इतर देशांसारखा खेळाचा गांभार्याने विचार करत नाही. आपल्याकडे आजही खेळाडूंना योग्य मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे क्रिडा दिवस साजरा करुन खेळ संस्कृतीच्या महत्व आणि जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment