राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे



राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे यांचा अनोखा उपक्रम


बीड प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था याचे पालन करण्यासाठी रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी कर्तव्यदक्ष असलेला विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट होय.या पोलीस विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे यांच्या पुढाकारातून राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बहिण भावाचे पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरे केले जाते. ज्या मुली, महिला यांना अडचणीच्या वेळी कोणतेही रक्ताचे नातेसंबंधाचे संबंध नसताना अगदी भावाप्रमाणे पाठीशी उभे राहून महिलांना न्याय देणारे पोलीस खऱ्या अर्थाने महिलांचे बंधू आहेत. आपल्या या खऱ्या रक्षणकर्त्या भाऊरायाची राखी बांधून राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना ओक्षण करून रक्षाबंधन करताना महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे. यावेळी उपस्थित असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड शहराध्यक्ष रेहान पठाण,मंगलताई जगताप, राणी शेख, चव्हाण ताई, सुरेखा नवले, वाघमारे ताई, सविता जैन आदींसह महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी रक्षाबंधन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनेक पोलिसांनी आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांनी सुद्धा आज रक्षाबंधन असताना आम्ही बहिणीकडे ओवाळायला जाऊ शकत नाही, कारण आम्ही तमाम महिलांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत आहोत. आपण ऑक्षण करून राखी बांधल्याने राखीची उणीव दूर केली अशी भावना व्यक्त केली. या उपक्रमाचे पोलीस डिपार्टमेंट सह सर्व विभागातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी