अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५७८ डी मार्गावर गतिरोधक असतिल तर एचसीपीएल कंपनीला लिंबागणेश येथे गतिरोधक बसविण्यात अडचण काय?? :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- ( दि.२२ ) बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील येळंबघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत. मात्र याच मार्गावर लिंबागणेश येथील बसस्थानक आणि भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविण्यास एचसीपीएल कंपनीला काय अडचण आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व हरिओम क्षीरसागर यांनी विचारला आहे. अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असुन शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अगदी महामार्गाला लागुनच असल्याने शाळा भरताना आणि शाळा सुटल्यानंतर गर्दी असते.याठिकाणी यापूर्वी सुद्धा वारंवार अपघाताच्या घटना घडलेल्या असुन या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या २ वर्षांपासून पालकांची असुन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली २-३ वेळा रास्तारोको आंदोलन करण्यात आलेले आहेत. एचसीपीएल कंप...