कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालयात विनम्र अभिवादन



 बीड प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर सावलीसारखी साथ देणारे व जर माझे जीवन चरित्र लिहिले तर अर्धे चरित्र दादासाहेब गायकवाड यांचे लिहिल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या महान कार्याबद्दल काढले होते असे थोर कर्मवीरांना त्यांच्या 53 व्या स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने भावपूर्ण विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता या संगीत प्रा. गजानन चित्रे अध्यक्षपदी तर आयु. बौद्धाचार्य सुभाष तांगडे व प्रशांत वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादा साहेबांच्या प्रतिमेस पुष्प पुष्प माला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास महामानव अधिवर्धन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.जि.वानखेडे यांनी केले तर सूत्रसंचालन राऊत यांनी केले ह्याप्रसंगी अध्यक्षांनी दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की बाबासाहेबांच्या महापरिनिवान नंतर चैत्यभूमीची निर्मिती दीक्षाभूमीची निर्मिती यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय? असा खडा सवाल विचारून 1964 साली भूमीहीना साठी गायरान जमीन व सरकारी पडीत जमिनी करता भूतो न भविष्यती असा सत्याग्रह व जेल भरो आंदोलन करून अनेकांना गायरान जमिनी करता यशस्वी प्रयत्न केला. भूमिहिन ना करता शंभर टक्के अनुदानावर जमीन खरेदी करण्याचे फलित म्हणजे योजना ही योजना महाराष्ट्र सरकार 2004 पासून राबविण्यात येत आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल बाबासाहेब बरोबर लढलेल्या लढ्याबद्दल सुभाष तांगडे, प्रशांत वासनिक व अड, तेजस वघमारे यांनी अनेक प्रसंगाद्वारे सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन के.एस. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास आयु बि.डी.तांगडे, दादाराव गायकवाड, अर्जुन जवंजाळ व बहुसंख्य सदस्यांची उपस्थिती होती. सरनाताईंनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी