मुरगाव बंदराच्या कुशीत वसलेल्या मंदिरात शानदार भजन सोहळा

.
  गोमंतकाच्या पश्चिम समुद्रकिनारी अर्थात मुरगाव बंदराच्या कुशीत श्री दामोदर राष्ट्रोळी ईस्वीटी ब्राह्मण देवता छोटेसे मंदिर वसलेले आहे . मंदिर निर्माण साठी सन्माननीय श्री अनिल कानकोणकर संस्थापक आणि अध्यक्ष यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटिश कालगणनेनुसार वर्षाच्या शेवटी येणारा सोमवार सन्माननीय सौ आणि श्री विनोद रामचंद्र आर्लेकर यांच्या यजमान पदाखाली उत्साहाने साजरा करण्यात आला. गोमंतकातील नामवंत भजन संगीतकार कै. मनोहर बुवा संगीत सांस्कृतिक संस्था आयोजित "मनोहर भजन रंग"या कार्यक्रमात श्री अशोक मांद्रेकर , श्री सूर्या शेट्ये, शिवम पालेकर, नंदकिशोर नारूळकर, गजानन नाईक, प्रदीप बांदेकर, कुमारी स्नेहा नार्वेकर, विनोद आर्लेकर, शिवराम गावस, आनंद शेट्ये, प्रेमानंद पेडणेकर, रामचंद्र मयेकर,, प्रेमानंद केरकर, देवेंद्र शेट्ये, ऋषक काणकोणकर, आणि बालकलाकार निमेश मयेकर व पुजारी सुहास लिमये. इ. कलाकारांचा सहभाग होता. मंदिराचे अध्यक्षांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन श्री अशोक मांद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यजमान श्री विनोद आर्लेकर (माजी वहातूक स़ंचालक गोवा सरकार ) यांचा सन्मान श्री राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच इतर सर्व मान्यवर कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मानही देवालयाच्या कार्यकारणीने केला. तदनंतर प्रसाद आणि चहापाण्यानी "मनोहर भजन रंगाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी