अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५७८ डी मार्गावर गतिरोधक असतिल तर एचसीपीएल कंपनीला लिंबागणेश येथे गतिरोधक बसविण्यात अडचण काय?? :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- ( दि.२२ ) बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील येळंबघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत. मात्र याच मार्गावर लिंबागणेश येथील बसस्थानक आणि भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविण्यास एचसीपीएल कंपनीला काय अडचण आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व हरिओम क्षीरसागर यांनी विचारला आहे.
अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असुन शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अगदी महामार्गाला लागुनच असल्याने शाळा भरताना आणि शाळा सुटल्यानंतर गर्दी असते.याठिकाणी यापूर्वी सुद्धा वारंवार अपघाताच्या घटना घडलेल्या असुन या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या २ वर्षांपासून पालकांची असुन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली २-३ वेळा रास्तारोको आंदोलन करण्यात आलेले आहेत.
एचसीपीएल कंपनी कडुन प्रशासनाची दिशाभूल :- डॉ.गणेश ढवळे
गेल्यावर्षी दि.४ जानेवारी २०२४ रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर गतिरोधक बसविण्यात यावेत या मागणीसाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३ तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तत्कालीन तहसीलदार सुहास हजारे यांनी याची दखल घेत दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी तहसिल कार्यालयात बैठक बोलावली होती.तेव्हा म.रा.म.वि.(मर्या) छत्रपती संभाजीनगर अभियंता महेश देशमुख,नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, एचसीपीएल कंपनीचे कंत्राटदार यांनी राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक बाबत सडक परीवहन व राजमार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दि.२९ आगस्ट २०१६ रोजीच्या पत्रकान्वये महामार्गावरील गतिरोधक बाबत सुचना प्राप्त अनुषंगाने गतिरोधक बसविण्यात येणार नाही असे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली.मात्र बसस्थानक, शाळा, धोकादायक वळण आदी अपघात प्रवण क्षेत्रात ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर बसविण्यात येते. त्याच अनुषंगाने एचपीएम कंपनीने येळंबघाट याठिकाणी गतिरोधक बसविले असुन रात्रीच्या वेळी लांबुन गतिरोधक दिसावेत यासाठी रेडीमेड बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लिंबागणेश याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी डॉ.गणेश ढवळे व हरिओम क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.
Comments
Post a Comment