रोजंदारी मजदूर सेनेच्या नव्या नेतृत्वाच्या दिशेने सन २०२५ची क्रांतिकारी सुरुवात

रोजंदारी मजदूर सेनेच्या नव्या नेतृत्वाच्या दिशेने सन २०२५ची क्रांतिकारी सुरुवात
परळी (प्रतिनिधी
रोजंदारी मजदूर सेनेने सन २००७ ते २ डिसेंबर २०१६ सलग ९ वर्षे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत/ कालकथीत बाबुभाई भालाधरे या खंबीर नेतृत्वाने कंत्राटी कामगारांसाठी आपले जीवन समर्पित करून विविध उपक्रम व आंदोलन केली. कंत्राटी कामगारांचे प्रश्न लावून धरले राज्यातील विविध ठिकाणी निवेदन देऊन व प्रसंगी आंदोलनाद्वारे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दिनांक ०२ डिसेंबर २०१६ रोजी त्यांचे अपघाती दुःखद निधन झाले. 

    दरम्यानच्या काळात बाबुभाईंच्या पत्नीने युनियनच्या कोराडी येथील कार्यालयाचा बेकायदेशीर कब्जा घेतला. तसेच युनियनच्या अध्यक्षपदाचा सुद्धा वारसा हक्काने दावा केला. परंतु लोकशाही मार्गाने केंद्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेऊन द्वितीय केंद्रिय अध्यक्ष म्हणुन दिवंगत/ कालकथीत भाई लखन वासनिक यांची निवड करण्यात आली. त्यांनी सुद्धा जानेवारी २०१८ ते २८ जून २०२० या कालखंडात विविध आंदोलन करून कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा अविरत प्रयत्न केला .त्यामुळे संघटनेला मरगळ आली होती, ती दूर झाली संघटनेमध्ये नवचेतना निर्माण केली.
वरती उल्लेख केल्याप्रमाणे
सदरिल कार्यालय हे कंत्राटी कामगारांच्या कष्टातून उभे
 केले होते.त्यावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबुभाई भालाधरे यांच्या पत्नी कोकीलाताई यांनी जो वारसा हक्काने कब्जा केला होता. तो कब्जा मी व कालकथित मा.लखन वासनिक यांनी न्यायालयीन लढा देऊन सदरिल युनियनचे कार्यालय पुन्हा परत मिळवले. त्यात चैनदास भालाधरे यांनी सहकार्य केले नाही कारण त्यांनी आमच्या प्रयत्नांना पुढे येऊन पाठींबा दिला नाही.मी व मा.लखन वासनिक यांनी कार्यालय तसेच कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली. या वेळी हा लढा फक्त द्वितीय अध्यक्ष
कालकथित भाई लखन वासनिक व केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे व त्या वेळचे सभासद यांचेच फारमोठे योगदान होते हे निर्विवाद होय
        
परंतु द्वितीय अध्यक्ष लखन उर्फ लक्ष्मण मारुती वासनिक यांचे सुद्धा दिनांक २९ जून २०२० रोजी अपघाती निधन झाले. 
वस्तुतः बाबू भाईचे वारसा हक्कांचे विचार न्हवते ते कार्या ला महत्व द्यायचे. म्हणूनच त्यांच्या मृत्यु नंतर त्यांच्या पत्नी चे कार्य नसल्यामुळे त्या अध्यक्ष पदी निवडून येऊ शकल्या नाहीत . तसेच चैन‌दास भालाधरे सुद्धा जर रीतसर घटनात्मक पद्धतीने निवडणूक झाली असती तर ते अध्यक्षपदी निवडून येऊ शकले नसते. जसे मा.लखन वासनिक दिवंगत बाबू भाई भालाधरे यांच्या पत्नी अध्यक्ष पदा साठी उभ्या होत्या तरी ते द्वितीय केंद्रिय अध्यक्ष झाले. निवडून आले. शेवटी रक्ता च्या वारसा पेक्षा वैचारिक कार्याचा वारसा महत्वाचा हे मा. लखन वासनिक यांच्या अध्यक्ष पदी निवडी वरून सिद्ध झाले.
त्यानंतर श्री चैनदास भालाधरे यांचे कार्य नसताना ते पुढे युनियन वाढवण्याचे कार्य करतील या विश्र्वसापोटी मी स्वतः भाई गौतम आगळे केंद्रीय महासचिव माझ्या सहिने भाई चैनदास भालाधरे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी फक्त २ वर्षा च्या काळासाठी दि.२४.११.२०२० रोजी नियुक्ती केली. परंतु त्यांनी अध्यक्ष पदाचा गैरवापर केला त्यांची २ वर्षासाठी मी हंगामी नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यानंतर मी त्यांना पदावरून बरखास्त करे पर्यंत ते बेकायदेशीर अध्यक्ष पद भूषवत होते.नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी २ वर्षांनंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे यासाठी मी अनेक वेळा पत्र देऊन मागणी करून सुद्धा बोलवली नाही. कारण ते अध्यक्ष पदि निवडून येणार नाही याची त्यांना भिती होती कारण त्यांचे कार्य काहीच न्हवते.
त्यांच्या कडून ज्या युनियन वाढी साठी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्यामध्ये ते कमी पडले. त्यांनी संस्थापक अध्यक्ष दिवंगत / कालकथीत बाबुभाई भालादरे यांच्या अपघाती निधनानंतर संघटनेची गद्दारी करून जे दुसऱ्या संघटनेत गेलेले गद्दार महेंद्र बागडे ,कमलेश राणे यांना परत युनियन मधे घेऊन समस्त कंत्राटी कामगारांचा त्यांनी विश्वासघात केला. युनियनचे केंद्रीय कार्यालय सतत बंद ठेवून कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचे काम थांबवण्यात आले. त्यांनी संघटनेचा पदभार स्वीकारल्यानंतर आजतागायत एकदाही सर्वसाधारण सभा घेतली नाही. संघाच्या विस्तारासाठी प्रभावी धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली नाही.तसेच ते काही उपक्रमातील अडथळे महत्त्वाचे ठरले.
त्यामुळे चैनदास भालाधरे यांना युनियनची घटना व नियमाची पायमल्ली करत असल्यामुळे त्यांना "मी भाई गौतम आगळे, द्वितीय अध्यक्ष मा.लखन वासनिक यांनी नेमलेला अधिकृत महासचिव म्हणून दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री चैनदास भालाधरे हे हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पण त्याचेही उत्तर त्यांनी दिले नाही, म्हणून घटनात्मक तरतुदींची पायमल्ली करीत असल्यामुळे त्यांची अध्यक्ष पदावरून आणि तत्कालीन केंद्रिय कार्यकारिणी दि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अधिकृत केंद्रीय महासचिव या नात्याने बरखास्त केली. 
एकंदर घटनेतील तरतूदी नुसार केंद्रिय कार्यकारणी व त्यांचे अध्यक्ष पद बरखास्त केल्यामुळे त्यांनी दि २२.१२ २०२४ रविवार रोजी केंद्रीय कार्यालय कोराडी, नागपूर येथे जी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली ती युनियनच्या घटना व नियम मध्ये बसत नसल्यामुळे त्या सभेत घेतलेले सर्व ठराव बेकायदेशीर आहेत, याची उपस्थितीत असणाऱ्या माजी पदाधिकारी व सन्माननीय सभासद यांनी नोंद घ्यावी.
दिनांक २९ नोव्हेंबर२०२४ रोजी सर्वसाधारण सभा नोटीस आदेश काढून दि ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी बारा वाजता चेंबरी रेस्ट हाऊस, औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील फक्त स्थळ बदलून ती सर्वसाधारण सभा परळी ऐवजी शासकीय विश्रामगृह, बीड, तालुका जिल्हा बीड येथे ठेवण्यात आली आहे . सदर उल्लेखित नियोजित सर्वसाधारण सभा ही संघाच्या घटना व नियमा नुसार असल्यामुळे दि०५/०१/२०२५ च्या सभेचे कामकाज संघाच्या प्रत्येक सभासद, कामगार व कार्यकर्त्याला बंधनकारक राहील याची सर्वांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.
२०२५ साठी नव्याने उद्दिष्ट निश्चिती: आता मागील चार वर्षाच्या अनुभवावर आधारित २०२५ हे वर्ष संघासाठी नव्या संधी घेऊन येणार आहे. खालील बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.
(१)
केंद्रीय कार्यकारिणीची निवड करणे. 
(२) 
युनियनच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे. नवीन उपक्रम व कार्यक्रम राबवून कंत्राटी कामगारांना आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. 
(३) 
प्रशिक्षण व चर्चासत्रे कंत्राटी कामगारांना अद्यावत कौशल्य व ज्ञान प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे, 
तरी सर्व सन्माननीय सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रोजंदारी मजदूर सेनेचे अधिकृत केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी