विकासाच्या नावावर बीडमध्ये बौद्ध विहाराची विटंबना,बांधकामाचे साहित्य अस्थाव्यस्थ टाकून विहाराचे पावित्र केले मलिन

विकासाच्या नावावर बीडमध्ये बौद्ध विहाराची विटंबना,बांधकामाचे साहित्य अस्थाव्यस्थ टाकून विहाराचे पावित्र केले मलिन.
संबंधीत कंस्ट्रक्शनवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.
बीड प्रतिनिधी,

      येथील प्रभाग क्रमांक 13 मधील अजिंठा बौद्ध विहाराच्या विकासाचे काम  वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश असतांना देखील गेल्या वर्षभरापासून एस-एस कंस्ट्रक्शनच्या ठेकादाराने विकास कामास चालढकल करत असतांना सुद्धा बीड पालिका प्रशासनाने देखील अशा ठेकादाराला कामाचे बीले अदा केली असल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. दरम्यान गेल्या गत वर्षभरात विहारात कोणतेही धम्म कार्य असो की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवच काय तर महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम देखील एस-एस कंस्ट्रक्शनच्या पुर्वाग्रह दुषित मानसिकतेमुळे झाला नाही. तसेच विहाराच्या आत आणि परिसरात ठेकेदाराने अस्थाव्यस्थपणे बांधकामाचे साहित्य टाकून विहाराचे पावित्र मलिन करुन विटंबना केल्याने बीडमधील बौद्ध समाजामध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे संबंधीत एस-एस कंस्ट्रक्शनच्या ठेकादारावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी धम्मा पारवेकर यांच्यासह बौद्ध समाज बांधवांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील महाराष्ट्र हौसिंग कॉलनीमध्ये अजिंठा बौद्ध विहार आहे. या बौद्ध विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म (वर्षवास) नियमितपणे केला जातो. तसेच नित्यनियमाने बुद्धवंदनेसह विविध धम्म कार्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शिवाय महापुरुषांचे जयंती उत्सव देखील मोठ्या थाटामाटात बौद्ध समाज बांधव एकत्रिरित्या साजरा करतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत बीड पालिकेच्या माध्यमातून एस-एस कंस्ट्रक्शनला बौद्ध विहाराच्या परिसरात भक्त निवासाचे काम तसेच प्रभागामध्ये सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे काम करण्यासंदर्भात कार्यारंभ आदेश 19 एप्रिल 2023 रोजी देण्यात आले. विशेष म्हणजे निविदा स्विकृती, करारनामा व कार्यारंभ आदेश देखील एकाच दिवशी बीड नगर परिषद प्रशासाने दिले. तसेच वर्षभराच्या आत संबंधीत विकास कामे पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आले होते.
मात्र 19 महिन्यांचा कालावधी लोटलेला असतांना सुद्धा आजतगायत बौद्ध विहाराच्या  परिसरातील भक्त निवासाचे काम अर्धवट अवस्थेत असून बांधकामाचे साहित्य विहारच्या आत आणि परिसरात अस्थाव्यस्थपणे टाकण्यात आले आहे. शिवाय प्रभागामध्ये नाल्यांची कामे करण्यात आली मात्र प्रकाश पाटील यांच्या घरापासून ते गिराम फौजी यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आलेला नाही. असे असतांना बीड पालिकेचे मुख्याधिकारी व उप-अभियंता यांनी या विकास कामांची पाहणी संयुक्तपणे पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र ही विकास कामे पूर्ण झाली किंवा नाहीत. याची पाहणी करण्यासाठी साधा न. प. बीडच्या अधिकार्‍यांना वेळ देखील नाही; म्हणूनच एस-एस कंस्ट्रक्शनच्या ठेकेदार विहाराचे काम करण्यास वेळखाऊपणा व विहाराची विटंबना करण्याचे काम करु लागल्याने बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. एस-एस कंस्ट्रक्शनवर पालिका प्रशासन मेहरबान का आहे? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधीत कामाची चौकशी करुन विहाराच्या कामामध्ये दिरंगाई करणार्‍या एस-एस कंस्ट्रक्शनवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत तत्काळ गुन्हा नाेंंद करावा. तसेच संबंधीत कामाची पुन्हा निविदा काढून नव्याने काम देण्यात यावे, अशी मागणी धम्मा पारवेकर, सरस्वती जाधव, अवंतीका वासनिक, शोभा साळवी, रत्नमाला चांदमारे, मायादेवी पारवेकर, अम्रपाली मगर, संगिता मगर, ललिता लांडगे, पुष्पा गवारे, स्वाती निलेश गायकवाड, उर्मिला लाड, सुजाता धुरंधरे, दिपीका वीर, पुजा रोकडे यांच्या बौद्ध समाज बांधवानी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी