एकल महिला संघटना च्या वतीने मनुस्मृती दहन



 बीड प्रतिनिधी - दि 25 डिसेंबर 2024 रोजी तुळजाई चौक येथे मनुस्मृती दहन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एकल महिला संघटना च्या सुरुवात केलेल्या सदस्य सामाजिक कार्यकर्त्या अर्चना ताई नागरगोजे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात झाली महिलांच्या जाचक असलेल्या त्यातील लिखित स्वरूपात विषमतेची भिंत तोडून संविधान मध्ये दिलेल्या महिलांसाठी हक्क व अधिकार याविषयी माहिती देण्यात आली अर्चना ताई, कोमल ताई यांचे भाषणे झाली आपल्या भाषणात अर्चना ताई यांनी संघटना ची सुरुवात महिलांच्या असलेल्या समस्या, प्रश्न व त्यांच्या बोलण्याची संधी यावर माहिती देऊन संघटना बांधणी व संघटना ची आजची गरज आजचे प्रश्न व संघटना ही निरंतर प्रक्रिया असून जोपर्यंत महिलांचे प्रश्न संपत नाही तोवर संघटना आहे व ही संघटना कुणी एक जणीची नसते ती सर्वांसाठी असते, महिलांना सर्व स्वतंत्र जगता यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे, यावेळी कोमल ताई यांनी मनुस्मृती मध्ये महिलांच्या विरोधात सांगितले त्यावर माहिती दिली व संविधान मध्ये महिलांचे अधिकार सांगितले तर सुनीता शेंडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर आंतरजातीय विवाह केलेल्या कोमल मस्के यांना यावेळी प्रसंगी सन्मानित करण्यात आले, भेदभाव नष्ट झाला पाहिजे व विषमता दूर होऊन समता यावी यासाठी संघटना कार्य करत आहे असे एकल महिला संघटना च्या कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे यानी सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थिती मनीषा गुंदेकर, नेहाताई साबळे, बेदरे ताई, पत्रकार बंधू व भगिनी गायकवाड ताई, सुनीताताई शेंडगे वायभसे सर यांची उपस्थिती होती, शिल्पा पंडित, अनिता ढोरमारे, रुक्मिणी नागापुरे, पूजा वजीर, सुनंदा ढवळे, शितल मतकर, रेणुका कुलथे, सारिका पवार यांनी परिश्रम घेतले तर शालन कानडे, मीरा नवले, सुरेखा आगाम, कौशल्या कळसुले, संगिता मतकर, मनीषा भडगळे, शिल्पा साबळे, साधना नागापुरे, संजीवनी आपरे, सुनीता कदम, अयोध्या जगताप, मंगल कानडे, संगिता मेटे, समीक्षा वाघमारे आदी एकल महिला संघटना च्या लिडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी