बीड शहर बचाव मंचाने घेतली एस.पी. नवनीत कॉवत यांची भेट
बीड शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थे बाबतच्या विविध प्रश्नांवर,बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट दरम्यान चर्चा
बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात नुकतेच सेवेत रुजू झालेले IPS अधिकारी नवनित कॉंवत SP बीड शहर बचाव मंचच्या वतीने भेट घेवून सस्नेह स्वागत करण्यात आले. विशेषतः विद्यार्थिनींना ट्यूशन्स, क्लासेस, वस्तीग्रह, इत्यादी ठिकाणी होणारा टवाळखोरांचा त्रास, बुलेट व दुचाक्यांवर फिरून मुलींना त्रास देणाऱ्या याच टवाळखोरांचा ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना शहरात विविध ठिकाणी होणारा त्रास -महिला सुरक्षा,रहदारी,ट्राफिक,नोपार्किंग,अतिक्रमण, विनापरवाना ध्वनिक्षेपकांचे,फटाक्यांचे अवेळी रात्री उशिरापर्यंत होणारे त्रास,चोऱ्या, नगरपालिकेचा गलथान कारभार व शहरामध्ये झालेले दुर्लक्ष, शहरात वाढत चाललेले अवैध धंदे व मादक पदार्थ इत्यादींचे वाढते जाळे,पोलीस चौक्या चालू असाव्यात वआवश्यक त्या ठिकाणी नवीन चालू करणे, एकंदरीत नागरिकांची गैरसोय व सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक समस्यांवर तपशिलात चर्चा केली.साहेबांनी लगेच नोंद घेत,अधिकारी वर्गास बोलावून काय कारवाई करयला हवी;त्या सूचना दिल्या.
नियमीतपणे भेटत जावू, वेळ लागेल,परंतू पुढील आठ ते पंधरा दिवसात निश्चीतपणे आवश्यक ते सर्वच बदल करण्याबाबत सर्व शिष्टमंडळाला आश्वस्त केले.एकंदर नवीन आलेल्या पोलीस अधीक्षक साहेबांचा प्रतिसाद चांगला होता. यावेळी बीड शहर बचाओ मंचाचे प्रवर्तक तथा निमंत्रक श्री नितीनजी जायभाये, प्रमुख मार्गदर्शक डीजी तांदळे सर (दादा),आमआदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा बीड शहर बचाव मंचाचे सचिव अशोकराव येडे, बीड शहर बचाव मंचाचे कायदेशीर सल्लागार अॅड.नितीन वाघमारे, निवृत्त एसटी अधिकारी सुधीर देशमुख, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, प्रमुख महिला प्रवक्त्या रुपालीताई देशपांडे,माजी समाज कल्याण अधिकारी उद्धव खरवडे, आदित्य गालफाडे आदी शहरातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment